
पुणे दि १८
राज्यातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील सर्व कायम कामगारांना दिवाळी पुर्वी वेतन होते त्यांनां बोनस ची रक्कम मिळते.
मात्र या वीज कंपनीच्या उत्कर्षामध्ये मोठा हिस्सा असलेले, तसेच कायम कामगारांच्या खांद्याला खांदा लावून ऊन वादळ वारा थंडी पाऊसाची तमा न बाळगता आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणारे, मोठ्या प्रमाणात वीज बिलाचा आर्थिक महसूल गोळा करणारे वीज कंत्राटी कामगार सुरक्षा रक्षक मीटर रीडर व अन्य कंत्राटी पद्धतीवरील सर्व प्रकारचे कामगार यांना कंत्राटदाराकडून दिवाळीपूर्वी वेतन अथवा ऍडव्हान्स वेतन न मिळाल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी साजरी करणे शक्य होणार नाही.
त्या मुळे राज्यातील वीज कंत्राटी कामगारांना आता दिवाळी पूर्वी वेतनाचे वेध लागले आहेत या साठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ)संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात व महामंत्री सचिन मेंगाळे यांनी राज्याचे मा.मुख्यमंत्री
मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब व मा.उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र देऊन यात लक्ष देण्याबाबत लेखी पत्रा व्दारे मागणी आहे.
मागील वर्षी ही हजारो वीज कंत्राटी कामगारांना दिवाळी पूर्वी वेतन मिळाले नाही या वर्षी जर वेतनापोटी ऍडव्हान्स रक्कम वीज कंपन्यांनी कंत्राटदारास दिल्यास या कष्टकरी वीज कंत्राटी कामगारांची दिवाळी गोड होईल अन्यथा महाराष्ट्राला सदैव प्रकाशात ठेवणाऱ्या या प्रकाश दूतांची दिवाळी देखील काळीच होईल असे भावनिक आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे संपुर्ण वेतन व बोनस रक्कम दिवाळी मिळावी अशी मागणी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांने केली आहे.