अकोल्यातील 8 खाण पट्ट्यांवर कारवाई!

अकोले/ प्रतिनिधी
महसूल विभागाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या व पर्यावरण विभागाची अनुमती नसलेल्या दगडखाणी बंद करण्याची कार्यवाही करणे. सुरू असल्याने अकोले तालुक्यातील आठ दगड खाणी बंद करण्यात आल्या आहेत
अकोले तालुक्यात एकूण ११ खाणपट्टे असून त्यांची मुदत संपलेली आहे. १७ ऑक्टोबर, २०२२ अखेर फक्त ३ खाणपट्टे चालू आहेत. तर 8 खानपट्टे बंद करण्यात आल्याची माहिती माहिती तहसीलदार सतीश थेटे यांनी दिली.
तसेच संबंधित मंडलाधिकारी,तलाठी यांनी खाणपट्ट्याच्या ठिकाणी समक्ष भेट देऊन संबंधित खाणपट्टा, क्रशर सील असल्याची खात्री करावी. असा आदेश देण्यात आला आहे त्या ठिकाणी किती ब्रास खंडी आणि क्रश सॅन्ड शिल्लक आहे याचाअहवाल सादर करावा. संबंधित मंडळधिकारी अधिकारी तलाठी यांनी मुख्यालयी राहून खाणपट्टा, क्रशरची वेळोवेळी तपासणी करून मुदत संपलेल्या खाणपट्टयातून उत्खनन होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेश दिले आहेत तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वाहतूक पास व ई.टी.पी जनरेट झाल्याशिवाय गौणखनिजाची वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. विना परवानगी. विना वाहतूक पास असलेले वाहन, खाणपट्टा सिल न केल्याचे आढळून आल्या आपणास सर्वस्वी जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे महसूल विभागाच्या आदेशात म्हटलेआहे
अकोले तालुक्यातील मुदत संपलेले स्टोन क्रशर व खाणपट्टा धारक खालील प्रमाणे
– किसन बबन महाले (बेलापूर), मनोजज्ञानेश्वर शिंदे (बेलापूर),दत्तात्रय धोंडीबा शेळके (बेलापूर), नामदेव निवृत्ती कुटे (बेलापूर),शरद मनोहर रत्नपारखी (वाशेरे), जगन्नाथ वसंत देशमुख(देवठाण), सचिन किसन सदगीर(कोंभाळणे), बाळासाहेब यशवंत आरोटे (जामगाव) असेआठ स्टोन क्रशर व खाणपट्टा धारक आहेत
मुदत संपलेल्या खाणपट्ट्यातून उत्खनन होणार नाही याबाबतचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.