महाराष्ट्रराजकारण

खासदार सुनील तटकरे बनले पिचड समर्थकांच्या टीकेचे धनी!

अकोले /प्रतिनिधी

मधुकरराव पिचड यांचे सोबत पदमसिंह पाटील, मोहिते पाटील यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस सोडली मग या घराण्यावर का बोलत नाहीत, त्यांच्यावर बोलल तर अजित दादांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मात्र मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना टार्गेट केले जात आहे. खासदार सुनील तटकरे यांनी पण असेच वक्तव्य केले आहे. असे मत भाजपा अकोले तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात माजी मंत्री खासदार सुनील तटकरे यांनी मधुकरराव पिचड यांच्या विषयी अनुदगार काढले आहे. त्याचा निषेध अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला.

खा. तटकरे यांच्या या वक्त्यव्याचा माजीमंत्री पिचड यांच्या समर्थकांनी जाहीर निषेध करीत वैभव पर्व सुरू होत आहे, ही वादळा पूर्वीची शांतता आहे असा सोशल मीडियावर तटकरे यांना इशारा दिला.
भाजपा अल्पसंख्याक आघाडी चे तालुकाध्यक्ष नाजीम शेख यांनी सुनील तटकरे यांना फोन लावून सांगितले की, मधुकरराव पिचड साहेब हे साहेबच आहे. ते संपणार नाही,ते अहमदनगर जिल्ह्याचे जादूगार आहेत असे सुनावले. असे सूनावताच आ.तटकरे यांनी ओके म्हणत फोन कट केला.हा फोन सोशल मीडियावर तुफान व्हायलर होत आहे.
भाजपा एन टि सेलचे सचिन उगले यांनी आ.तटकरे यांना फोन लावला व पिचड साहेब हे नांव घेताच आ.तटकरे यांनी फोन कट केला.ही ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सुनिल तटकरे साहेब आज शिर्डित येऊन बोंबलले पिचड साहेब तालुक्याचे नेते झाले मात्र याच सुनिल तटलरेच्या वाढदिवसाच्या व्हिडिओ मध्ये पिचड साहेबांचा फोटो यांनी लावलाय उगाच काहीही स्टंट करायचे.
पिचड समर्थक शंभू नेहे यांनी सोशल मिडिया वर तटकरे यांना सूनवताना सांगितले की, आम्ही अनेक वेळा तटकरे यांना पिचड साहेब यांच्या पाया पडताना पाहिले आहे. संतोष सोडनर, संतोष तिकांडे यांनी ही आपल्या पध्दतीने निषेध नोंदविला आहे.
भाजपचे नेते रमेश राक्षे यांनी तर टोकाची टीकानसुनील तटकरे यांच्यावर करून त्यांच्या विधानांचा जाहीर निषेध केला. रमेश राक्षे यांचा सोशल मीडियावरील मेसेज जशाचा तसा खालील प्रमाणे…. माझ्या तमाम मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथिल अधिवेशनात तटतटकरे , अकोले तालुक्याचे भाग्यविधाते मा.पिचड साहेबांवर जसा एखादा एखाद्याचा हुकमी पाळीव कुत्रा जसा भुंकतों ना!.. अगदी तसाच काकाची राखणदारी करणारा, पण त्या राखणदारीच्या बदल्यात त्याला पण खासदारकी अनं पोरीला आमदारकी मिळवणारा…..त्या तिकडचा !!.. कोकणातला तटकरे आदिवासी जनतेचा मसिहा म्हणून ज्यांना अवघा महाराष्ट्रच नव्हे तर नुकत्याच महामाहिम राष्ट्रपती झालेल्या द्रोपदी मुर्म यांनी दिल्लीत बोलावून आदिवासी समाजाच्या कल्याणकारी विविध योजनां सबंधी माहिती घेऊन विचारविनिमय केला अशा आदरणीय पिचड साहेबांच्या बाबत जे जे विधानं केली त्याचा तालुक्यातील जनतेच्या वतीने प्रथम निषेध करतो… पिचड साहेब तालुक्याचे पण नेते राहिले नाही असं विधान या काकाच्या लाभार्थी झिलकर्याने केले आहे, त्या बुद्धहिन व अक्कल शुन्य तटतटकरे अरे आज घडीला पिचड साहेब दवाखान्यात आहेत ज्या़ंच्या बद्दल तु विधानं करतो त्या पिचड साहेबांच्या मुळे आज तुमची जी राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे तो तुझ्या त्या काकांचा पक्ष ४० वर्ष तुझ्या काकांच्या खांद्याला खांदा भिडवून पिचड साहेबांनी पण कष्ट उचललेले आहे हे लक्षात नसेल तर काकांनां विचार जरा, वाच्याळ विरा इतिहास हा कधीच पुसता येत नाही आणि राहिला प्रश्न त्यांचे नेतृत्व संपले म्हणण्याचा एकट्या पिचड साहेबांचे राजकारण संपविण्यासाठी पुरे सात पक्ष आणि कोटी कोटीने पैसा पेरावा लागला तरी नाकात दम आणला आणि तोंडी फेस आला आणि पिचड साहेबांचे राजकारण संपण्याच्या बाता , झोडतो अरे ५०/५० चे वर आमदार निवडून आणता येईना आणि ऊरताणुन पिचड साहेबांच्या वर बोलतो जरा आत्मपरीक्षण करा तुमचा गृहमंत्री. १०० कोटीच्या वसुलीत जेलची हवा खातोय त्या कुत्र्याची नवाब मलिकची संपत्ती आज कोर्टाने ईडीला जप्त करण्याची सुचना केली तो तुमचा छगन दोन जेलात मुक्काम करुन आला आहे अरे तुमचा पार कचरा झाला, तुमच्या इज्जतीचा फालुदा होऊन ती तुमची लोकप्रिय इज्जत महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली असताना तुम्ही काय पिचड साहेबांवर बोलताय जरा धिर धरा हे आता वैभव पर्व सुरू झाले आहे .हळूहळू यांचे वादळात रुपांतर होईल तेव्हां तुमचे हे परीस्थिती नुसार बदलणारे बाजारु दलाल पाल्या पाचोळ्यागत हवेत तरंगतील फक्त wait and watch हि एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता समज कोकणातील काका भक्त लाभार्थी पंडिता तुझ्या साठी आज एवढं पुरेसं….रमेश राक्षे


या सर्व प्रकारातून भाजपचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.आता जिल्ह्यातील व तालुक्यातील पहिल्या पट्टीचे नेते मंडळी याबाबत काय भूमिका घेतात या कडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button