अहमदनगर

भगवानगड 46 गाव सहीत मिरी करंजी तिसगाव व अमरापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठा गैरव्यवहार ?

!

पाणीपुरवठा मंत्री यांचे ओएसडी बडे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात करोडो रुपयांची डील !

दत्तात्रय शिंदे

पाथर्डी प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे यामध्ये भगवानगड ४६ गाव मिरी करंजी तिसगाव आणि अमरापूर या तीन पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे परंतु या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार होत असून कामांमध्ये अननियमितता आहे याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे उत्तर महाराष्ट्राचे प्रसार माध्यम संयोजक दादासाहेब खेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीवन प्राधिकरण मुख्य सचिव अप्पर सचिव तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली आहे तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग मुंबई यांच्याकडील चौकशी समिती येऊन भगवानगड आणि 46 गाव पाणीपुरवठा योजनचे काम पाहणी करून गेली आहे यावर रितसर संबंधित व्ही यु बी कंट्रक्शन या ठिकाणी एजन्सीवर कारवाई करणे अपेक्षित होते परंतु वरिष्ठांना चौकशी अहवाल सोपवला जाईल असे सोयीस्कर उत्तर देऊन कारवाई करण्याचे चौकशी समितीने टाळण्याचे दिसत आहे यावर संबंधित व्ही यु बी कंट्रक्शन या ठेका एजन्सीचे काम तीनही पाणीपुरवठा योजनेची चालू असलेले काम थांबवून त्यांची देयके देण्यात येऊ नयेत अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग मुंबई या कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा इशारा दादासाहेब खेडकर यांनी दिला आहे.

– भगवानगड ४६ गाव मिरी करंजी तिसगाव आणि अमरापूर या तीन पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून सदरील कामाची कॉलिटी कंट्रोल कडून तपासणी करण्याची मागणी केली आहे तसेच सदरील कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिकरित्या करण्याची मागणी करूनही एमजीपीचे अधिकारी त्याकडे सोयीस्कर डोळे झाक करत आहेत सदरील पाणीपुरवठा योजनेचे काम मुख्य ठेका एजन्सी न करता सब ठेका एजन्सी कडून काम करण्यात येत असल्याने पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे तीन तेरा वाजले आहेत

– महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे ओएसडी बडे यांच्यामार्फत भगवानगड ४६ गाव मिरी करंजी तिसगाव आणि अमरापूर पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या व्ही यु बी कंट्रक्शन या ठेका एजन्सीला कशा पद्धतीने देण्यात आल्या याची चौकशी करण्यात यावी सदर निविदा प्रक्रिया पूर्णतः चुकीच्या केलेल्या असून यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे तसेच या पाणीपुरवठा योजनेचे निरीक्षण करण्याचे काम एमजेपी करत असून यामध्ये एमजीपीचे शाम वारे मृणाल धगधगे यांचे व्ही यु बी कंट्रक्शन या ठेका एजन्सीच्या ठेकेदाराबरोबर हित संबंध असल्याने ते कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत यामुळे शाम वारे मृणाल धगधगे यांची‌ चौकशी करून त्यांचे निलंबन करण्यात यावे – प्रा दादासाहेब खेडकर – भारतीय जनता पार्टी – संयोजक प्रसारमाध्यम प्रमुख उत्तर महाराष्ट्र .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button