भारत जोडो यात्रेसाठी पारनेर मधून कॉंग्रेसचे पदाधिकारी जाणार. उत्तमराव पठारे

पारनेर प्रतिनिधी
माजी खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली भारत जोडो यात्रा दि.०७/११/२०२२ रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी पोहचली असून या यात्रेसाठी तालुका अध्यक्ष मा.संभाजी रोहाकले यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तालुक्यातून सर्व पदाधिकारी जाणार असल्याची माहिती जिल्हा युवक कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव पठारे यांनी दिली.
सदर भारत जोडो यात्रा ही नांदेड,हिंगोली ,वाशीम, अकोला,व बुलढाणा या चार जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. सदर यात्रा ही १४ दिवस महाराष्ट्रात राहणार असून या यात्रेसाठी विधिमंडळाचे पक्षनेते माजी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात आणि माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली दि.१७ पासून दि.२०.११.२०२२ पर्यंत पारनेर मधून सर्व पदाधिकारी बुलढाणा येथे जाणार आहेत.