नेप्ती कांदा बाजार चौक ते निमगाव वाघा रस्ता दुरुस्त करा, निमगाव वाघा ग्रामस्थांची आमदार निलेश लंके यांचे कडे मागणी

नगर-नेप्ती कांदा बाजार मार्केट चौक ते निमगाव वाघा रस्ता दुरुस्ती करणे बाबतचे निवेदन निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे व नगर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे यांनी नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना निवेदन देण्यात आले
.याप्रसंगी स्वीय सहाय्यक शिवा कराळे,रामदास आडागळे,नेप्ती गावाचे माजी उपसरपंच शिवाजी होळकर आदी उपस्थित होते. पै.नाना डोंगरे म्हणाले,निमगाव वाघा ते कांदा बाजार मार्केट चौक हा रस्ता नगर शहराला जोडणारा मुख्य रस्ता असुन हा रस्ता अनेक खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे.निमगाव वाघा व रानमळा येथील शेतकऱ्यांना कांदा मार्केट तसेच भाजीपाला मार्केट येथे शेतीमाल आणण्यासाठी जिकिरीची झाले आहे.तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी येण्या जाण्यासाठी हा रस्ता खड्डेमय झाल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे.
नगर शहराला जोडणारा नेप्ती कांदा बाजार मार्केट चौक ते निमगाव वाघापर्यंतचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा. अनेक दिवसांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करावे.अशा मागणीचे निवेदन निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी दिले आहे. या निवेदनावर निमगाव वाघाचे सरपंच रूपालीताई जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड,ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे,ग्रामपंचायत सदस्य दीपक गायकवाड,नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे आदींच्या सह्या आहेत. फोटोकॅप्शन-नेप्ती कांदा बाजार मार्केट चौक ते निमगाव वाघा रस्ता दुरुस्ती करणे बाबतचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे व नगर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे यांच्या हस्ते नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना निमगाव वाघा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.