अकोल्यात कैद्यांना मिळाले आपल्या अधिकाराचे मार्गदर्शन!

अकोले प्रतिनिधी-
पॅन इंडिया जागरुकता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निदेॅशानुसार अकोले विधीसेवासमिती , अकाेले पोलिस स्टेशन व अकोले वकील संघ यांचे संयुक्त विदयमाने अकोले सबजेल येथे ‘ हक हमारा भी तो है @ 75 ‘ या उपक्रमा अंतर्गत अकोले सब जेल मधील आरोपींना त्यांचे अधिकाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी अकोले न्यायालयातील प्रथमवर्ग प्रधान दिवाणी न्ययाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. आर. के. गायकवाड हे होते.
यावेळी ॲड. सौ. सरोजिनी नेहे, अध्यक्षा अकोले तालुका वकीलसंघ यांनी प्रास्तविक केले तर सूत्रसंचालन ॲड एस.बी. वाकचौरे, उपाध्यक्ष तालुका वकील संघ यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ॲड आर. डी. नवले यांनी आरोपींना त्यांचे अधिकाराविषयी जागृत केले त्यांना भेटणा-या सुविधा इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. तसेच ॲड बी. आर चौधरी यांनी आरोपींना गुन्हयापासुन परावृत्त होणेबाबत गुन्हा केल्यामुळे त्यांचे सामाजिक जीवनावर होणारे दुष्परीणाम त्यांना समजावून सांगितले तसेच त्यांना त्यांचे कायदेविषयक अधिकारांबाबत मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश मा. आर के गायकवाड यांनी आरोपीना मार्गदर्शन करताना त्यांना अन्यायाविरुध्द न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार सर्वांनाच समान आहेत. आर्थिक दृष्टया कमकुवत घटकांतील लोकांना न्याय मिळवण्यात काही अडचणी येत असतील त्यांना त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडण्यासाठी व अन्याय निवारणार्थ तालुका विधीसेवा समितीमार्फत मोफत वकील देण्याची सोय उपलब्ध आहे. याचा लाभ घेण्यासाठी तालुका विधी सेवा समिती अकोले यांचेकडे संपर्क करावा. आरोपींना गुन्हया पासुन परावृत्त्त होणेबाबत तसचे गुन्हा केल्यास त्यांचे वैयक्तीक व सामाजिक जीवनावर होणारे वाईट परीणाम त्यांना समजावून सांगितले .
यावेळी अकोले न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. आर. के. गायकवाड साहेब अकोले तालुका वकील संघाचे अध्यक्षा उपाध्यक्ष, व ॲड संभाजी जाधव, ॲड बी. एम. नवले, ॲड डि.एम. काकड, ॲड विनोद भोसले यांचे सह तसेच अकोले पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मिथुन घुगे,नायब तहसिलदार श्री महाले ,अकोले न्यायालयातील विधीसेवा समितीचे काम पाहणारे वरीष्ठ लिपिक सौ. रुपाली वल्लाळ व इतर न्यायालयीन कर्मचारी,मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांचे आभार ॲड सौ पुष्पा वाकचौरे यांनी मानले
“””””””