वनकुटे व वासुंंदे पाणी योजनांना मंजुरी ९ कोटी ३१ लाखांचा निधी

आमदार नीलेश लंके यांची माहिती
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
तालुक्यातील वनकुटे व वासुंदे येथील पाणी योजनांसाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत एकूण ९ कोटी ३१ लाख २० हजार रूपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली.
वनकुटे पाणी योजनेसाठी ४ कोटी ७० लाख ८७ हजार तर वासुंदे योजनेसाठी ४ कोटी ६० लाख ३७ हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यात विविध गावांच्या पाणी योजनांसाठी यापूर्वी मोठा निधी प्राप्त झाला होता. जास्त खर्चाच्या योजनांची मंजुरी प्रलंबित होत्या. त्यापैकी वासुंदे व वनकुटे योजनांना मंजुरी मिळाल्याने आ. लंके यांनी सांगितले.
या योजनांमुळे दोन्ही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी दुर होणार आहे. तालुक्यातील विविध गावांच्या पाणी योजनांसाठी आ. लंके यांनी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला होता. तसे प्रस्तावही सादर करण्यात आले होते. लंके यांच्या पाठपुराव्यास यश येऊन योजनांना मंजुरी मिळाली. वनकुटे व वासुंंदे येथील ग्रामस्थांनी आ. लंके यांचे आभार मानले आहेत.