निमगाव वाघा येथे नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचे शानदार उद्घाटन.

कुस्ती स्पर्धेतून नामवंत खेळाडू तयार होतील -माधवराव लामखडे
दत्ता ठुबे
नगर-पूर्वीच्या काळात हिवरे बाजार या गावातील पैलवानांचा नावलौकिक होता.पद्मश्री पोपटराव पवार यांचे वडिलांनी अनेक पैलवानांना राहण्याची सोय तसेच खुराक देऊन अनेक सहकार्य केले होते.नगर तालुक्यातील नेप्ती,निमगाव वाघा,हिवरे बाजार तसेच पारनेर भागातील पैलवानांनी जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. ग्रामीण भागात मैदानी खेळाला फार महत्त्व आहे.निमगाव वाघा येथे स्व.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या वतीने दरवर्षी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.या शालेय कुस्ती स्पर्धेतून नामवंत खेळाडू तयार होते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सदस्य माधवराव लामखडे यांनी केले
. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा परिषद, नगर तालुका क्रीडा समिती व नवनाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचे शानदार उद्घाटन माधवराव लामखडे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे व उपाध्यक्ष तथा स्पर्धा संयोजक पै.नाना डोंगरे,भागचंद जाधव, मुख्याध्यापक किसन वाबळे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, पैलवान संतोष कोतकर, भाऊसाहेब धावडे,भानुदास ठोकळ,उत्तम कांडेकर, बाळासाहेब बोडखे,प्रताप बांडे, मिलिंद थोरे,दिलावर शेख,बबन शेळके,डॉ.विजय जाधव,बाळू भापकर,गुलाब केदार,विकास निकम,अशोक जाधव,अरुण काळे आदींसह स्पर्धेसाठी पंच म्हणून पै.गणेश जाधव,वैभव जाधव,मल्हारी कांडेकर, अँड.समीर पटेल आदींसह क्रीडा शिक्षक उपस्थित होते. रामदास भोर म्हणाले,ग्रामीण भागात खेळाडूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तरी या सर्व अडचणींना मात करून ग्रामीण भागातील खेळाडू पुढे येत आहेत.नगर तालुक्यात होणाऱ्या शालेय कुस्ती स्पर्धेमुळे खेळाडूंना कामगिरी करण्याची संधी निर्माण झाली आहे.सध्या मोबाईल व टीव्हीच्या जमान्यात मुले ही मैदानी खेळापासून दूर जात आहेत.खेळाडूंना शाळेतील क्रीडा शिक्षकांसोबत पालकांनीही मार्गदर्शन करावे.ज्या खेळाडूंच्या सोबत पालक स्पर्धेसाठी येत असतात त्या खेळाडूंचा उत्साह वाढतो.या शालेय क्रीडा स्पर्धेतून अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय खेळाडू घडतील. स्पर्धेचे आयोजक पै.नाना डोंगरे यांनी स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पै.नाना डोंगरे म्हणाले,कोरोना काळात दोन वर्ष कोणत्याही खेळाच्या स्पर्धा झाले नाहीत.त्यामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान झाले आहे.कोरोना नंतर कुस्ती स्पर्धा ही नगर तालुक्यातील पहिली स्पर्धा आहे.या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना संधी निर्माण झाली आहे.या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा परिषद,नगर तालुका क्रीडा समिती व नवनाथ विद्यालय आदींचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पै.नाना डोंगरे यांनी केले तर आभार चंद्रकांत पवार यांनी मानले.