अहमदनगर

पारनेर साखर कारखान्यावर एक ऑगस्टला ताबा मोर्चा …

देवीभोयरेतील बैठकीत कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीचा निर्णय

दत्ता ठुबे
पारनेर :पारनेर सहकारी साखर कारखान्याचा येत्या एक ऑगस्टला ताबा घेण्याचा ठराव कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीच्या देवीभोयरेतील
बैठकीत घेण्यात आला आहे.
साखर कारखान्याच्या जमीन हस्तांतरणाचा निकाल सभासदांच्या बाजुने लागल्याने बचाव समितीची बैठक देवीभोयरेत संपन्न झाली.
कारखाना विषयी विविध याचिकांच्या
उर्वरीत खटल्यांविषयी चर्चा करण्यात आली.
पारनेर साखर कारखाना बळकावणाऱ्या क्रांती शुगरला यावेळी
कायदेशीर नोटीस बजावण्यात आली.
येत्या पंधरा दिवसांत कारखान्याची अतिक्रमित दहा हेक्टर जमीन खाली करावी.या जागेवरील मुद्देमाल त्वरीत
हटवावा त्यापुर्वी क्रांती शुगर यांनी
कारखान्याच्या आठ वर्षे वापरलेल्या जागेचा मोबदला व गेल्या आठ वर्षांपासुन क्रांती शुगर पारनेर यांनी पारनेर कारखान्याचा औद्योगिक परवाना वापरल्याचा मोबदला नोटीसद्वारे मागण्यात आला आहे.क्रांती शुगर यांनी नोटीस स्विकारण्याला नकार दिल्याने नोटीस कार्यालयाबाहेर चिटकवण्यात आले.पंधरा दिवसांत ४० कोटी रुपयांचा
पारनेर कारखान्याच्या वापरलेल्या मालमत्तेचा मोबदला न दिल्यास
त्यापोटी संपुर्ण कारखाना मालमत्ता
ताब्यात घेण्यात येईल असा इशारा नोटिस मध्ये देण्यात आला.
येत्या एक ऑगस्टला शंभर टॅक्टर व
हजारो सभासद,शेतकरी कारखान्यावर ताबा मोर्चा काढणार आहे.यात सर्व शेतकरी,सभासद,कामगार यांनी सामील व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
महसुल मंत्री यांनी पारनेर साखर कारखान्याच्या जमीन व्यवहाराला बेकायदा ठरवून कारखान्याच्या वीस हजार सभासदांना न्याय दिल्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला.पारनेर साखर कारखान्याच्या पुनर्जीवनाचा प्रस्ताव
मुख्यमंत्री कार्यालयाकडे नुकताच सादर करण्यात आला आहे.त्यावर लवकरच निर्णय होवून अवसायनातील
या संस्थेचे पुनर्जीवन होत आहे.यासाठी पाठपुरावा चालु असल्याचे
समितीचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी सांगितले.
नवसपुर्ती ….
समितीने दिलेल्या कारखान्याच्या लढ्याला दैवी शक्तीचे पाठबळ मिळाले असल्याची भावना यावेळी सर्वांची होती.साखर कारखाना बचाव समितीने देवीभोयरेतील अंबिकामातेला साडीचोळी अर्पण करून नवसपुर्ती केली.

सरपंचाची अरेरावी … !
देवीभोयरेतील मंदिर सभागृहात बचाव समितीचे कार्यकर्ते जमताच तेथील सरपंच विठ्ठल सरडे यांनी मंदिर
सभागृहात बैठक घेण्यास मज्जाव केला व मंदिर कर्मचा-याला पाठवून अरेरावी केली.यावेळी समितीने मंदिरातच बैठक घेतली व सरपंचाच्या भुमिकेचा निषेध केला.
यावेळी संतोष वाडेकर,अशोक आंधळे,संभाजीराव सालके,शंकर गुंड,नवनाथ तनपुरे,सुनिल चौधरी,कृष्णाजी बडवे,खंडू भुकन,कांता लंके,बाळासाहेब कवाद,सतिष रासकर,सागर गुंड,दत्ता पवार,दत्ता भुकन,शंकर तांबे,विठ्ठल कवाद,मंगेश वराळ,गंगाधर सालके,गोविंद बडवे,बाबाजी गाडीलकर,संतोष सालके,बाबुराव मुळे,तुकाराम तनपुरे,दत्तात्रय जाधव,संजय वाखारे,सुभाष मगर,राहुल मुळे आदि शेतकरी सभासद हजर होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button