सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात उद्योजिका विनया शेट्टी यांचे वाढदिवसानिमित्त अन्नदान व महाप्रसाद

अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे- के.के.शेट्टी
नगर-अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे त्यामुळे आम्ही मंदिरात दर शनिवारी व रविवारी तसेच मकर विल्लकु महोत्सवामध्ये सलग ६० दिवस भाविक भक्ताच्या सहकार्याने अन्नदान महाप्रसाद सर्वासाठी करतो. सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात उद्योजिका विनया शेट्टी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अन्नदान,महाप्रसाद ठेवला होता त्यावेळी मंदिराचे अध्यक्ष के के शेट्टी बोलत होते.यावेळी विनया शेट्टी यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मोहन मानधना,ज्योती दीपक,के गणेश,के राव, नित्यानंद नाईक,शंकर बेबी,श्री गोपी आदींसह मित्रपरिवार व भाविक उपस्थित होते.
शेट्टी पुढे म्हणाले जो मनुष्य अन्नदान करतो त्याला संसाराची सर्व फळे प्राप्त होतात.अन्नदान हे एखाद्याच्या कुवतीनुसार आणि सोयीनुसार केले पाहिजे. यामुळे परम कल्याणाची प्राप्ती होते.विशेषतः अन्नदान हा जीवनातील आदराचा घटक आहे.म्हणून अन्नदान केले पाहिजे,अन्नदान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि इहलोक आणि परलोकात सुख प्राप्त होते.
विनया शेट्टी म्हणाल्या एखाद्या हॉटेल मध्ये वाढदिवस साजरा करून जो आनंद मिळत नाही तो मंदिरात मिळतो. येथे सर्व परिवार,भेदभाव नाही म्हणून प्रत्येकाने आपला वाढदिवस अशा ठिकाणी साजरा केला पाहिजे.अन्न हा जीवनाचा मुख्य आधार आहे म्हणूनच अन्नदान म्हणजे जीवनदान देण्यासारखे आहे.अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले जाते.धर्मात अन्नदान केल्याशिवाय कोणताही जप,तप,यज्ञ इत्यादी पूर्ण होत नाहीत.अन्न ही एकच गोष्ट आहे जी शरीराबरोबरच आत्म्यालाही तृप्त करते. त्यामुळेच काही दान करायचे असेल तर अन्नदान करा असे त्या म्हणाल्या.




