इतर

प्रकाश आरोटे यांच्या ‘माझी स्मरणगाथा’ पुस्तकाचे १६ ऑगस्ट ला प्रकाशन

अकोले, प्रतिनिधी दि, १०

अकोले तालुक्याच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा वेध घेणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आरोटे लिखित ‘माझी स्मरणगाथा’ या बहुप्रतीक्षित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता अकोले महाविद्यालयातील के. बी. दादा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे,अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चपराक प्रकाशन, पुणेचे प्रकाशक धनश्याम पाटील विराजमान राहतील.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष,थोर विचारवंत प्रा.एस. झेड.देशमुख आणि माजी आमदार वैभव पिचड, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, युवा नेते अमित भांगरे, अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष सतिश नाईकवाडी, सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक भाऊसाहेब गायकर आणि शिक्षण तज्ज्ञ , लेखक , ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

‘माझी स्मरणगाथा’ हे पुस्तक अकोले तालुक्याच्या इतिहास, समाजजीवन, संस्कृती आणि परिवर्तनाचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणारे महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरणार असून इतिहासप्रेमी, साहित्यप्रेमी आणि संशोधकांसाठी ते एक मौल्यवान संदर्भग्रंथ ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास साहित्य, पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन निमंत्रक रुपाली आरोटे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आरोटे, इंजि.अक्षय आरोटे, डॉ. श्रावणी आरोटे, नमामी आणि य:मी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button