अकोल्याच्या नगराध्यक्ष धुमाळ कि नाईकवाडी उद्या फैसला

माजी आमदार वैभवराव पिचडांच्या नेतृत्वाची उदया अग्निपरीक्षा
अकोले प्रतिनिधी
अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सुरुवातीला चौरंगी होण्याची शक्यता असलेली लढत अर्ज माघारीनंतर वैष्णवी सोमेश्वर धुमाळ आणि सोनाली लक्ष्मीकांत नाईकवाडी यांच्यात रंगणार आहे. त्यामुळे शुक्रवारी, ३१ जुलै रोजी होणारी निवडणूक माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या राजकीय नेतृत्वाची कसोटी मानली जात आहे.पीठासीनअरुण उंडे यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीत केवळ दोन उमेदवार शिल्लक राहिल्याने दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले.आहे नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण असले तरी दोन्ही प्रमुख उमेदवार महिला आहेत. नगराध्यक्षपदासाठी वैष्णवी धुमाळ यांना उमेदवारी दिली, तर सोनाली नाईकवाडी यांनी स्वतंत्र शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. भाजपमधील दोन गटांनी उमेदवार दिल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहे

१७ पैकी सुमारे १२ नगरसेवकांचा पाठिंबा सोनाली नाईकवाडी यांना असल्याचा दावा केला जात आहे. तर वैष्णवी धुमाळ यांच्या बाजूने भाजपचे अधिकृत पाच नगरसेवक असून काही अन्य नगरसेवकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
३१ जुलैचा निकाल केवळ नगराध्यक्ष कोण होणार हेच ठरवणार नसून अकोल्यातील पुढील राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होणार आहे.
या निवडणुकीचा निकाल माजी आमदार पिचड यांच्या नेतृत्वासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, दोन्ही गटांकडून संख्याबळाचे वेगवेगळे दावे करण्यात येत असून त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे अंतिम चित्र ३१ जुलै रोजीच्या मतदान आणि निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
=≠======



