अहमदनगरइतर

मुळा कॅनॉल मार्फत शेतीसाठी पाणी दया अन्यथा धरणे आंदोलन!

दत्तात्रय शिंदे

महादर्पण प्रतिनिधी

मुळा धरणातील पाणी मुळा कॅनल मार्फत शेतीसाठी तातडीने देण्यात यावे अन्यथा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे

मुळा धरणात समाधानकारक जलसाठा असून ओव्हरफ्लो होणारे पाणी मुळा कॅनॉलमार्फत शेतीसाठी उपलब्ध करून दिल्यास हजारो एकर क्षेत्राला दिलासा मिळेल
. “शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके वाळत आहेत आणि दुसरीकडे धरणातील पाणी नदीत सोडले जात आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी
भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनावर भगवान गंगावणे, माणिकराव होंडे, मच्छिंद्र म्हस्के, लक्ष्मण पांढरे,सुरेशराव डिके, गोरख घुले, प्रा. स्वरूपचंद गायकवाड, संजय पवार, मल्हारी सांगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहे आता पाटबंधारे विभाग कोणता निर्णय घेतो, याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मुळा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून धरण सुमारे 90 टक्के भरले आहे
धरणातील अतिरिक्त पाणी मुळा कॅनॉलमार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे,
याबाबत कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर यांना निवेदन देऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य
न झाल्यास १७ ऑगस्ट २०२६ रोजी विभागीय
कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

रस्तापूर, चांदा, कौठा, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरे, तेलकुडगाव देडगाव आणि अमरापूर या परिसरात यंदा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. परिणामी शेतातील खरीप पिके करपू लागली असून शेतकरी
चिंताग्रस्त झाले आहेत. अनेक भागांमध्ये मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी, तुर तसेच इतर पिकांना पाण्याअभावी फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button