कोतुळेश्वर विद्यालयाचे माजी प्राचार्य बी के देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून सन्मानित

अकोले प्रतिनिधी
क्रीडा क्षेत्रामध्ये केलेल्या समर्पित कार्याबद्दल कोतुळेश्वर विद्यालयाचे माजी प्राचार्य बी के देशमुख यांना जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून सन्मानित करण्यात आले
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर यांचे वतीने सन्मानचिन्ह देऊन एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले
श्री. भागवत देशमुख यांनी रयत शिक्षण संस्थेच्या अकोले, संगमनेर,कोपरगाव तालुक्यातील शाळा मध्ये सेवा केली आपल्या सेवाकाळात अनेक उत्कृष्ट खेळाडू घडविले आणि क्रीडा क्षेत्राकरिता अमूल्य योगदान आणि अविस्मरणीय सेवा दिली व सेवानिवृत्त झाले
क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या समर्पित कार्याबद्दल बी. के. देशमुख यांना अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी, श्री. ज्ञानेश्वर खुरंगे यांनी नुकतेच सन्मानित केले .



