निमगाव वाघा येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे आळंदी कडे प्रस्थान !

दत्ता ठुबे
नगर-संत ज्ञानोबाराय,संत तुकोबाराय,संतासह सर्वच थोर संतांनी खांद्यावर पताका घेऊन मृदुंग,टाळासह नाचत गात जी पंढरीची वारी केली व भक्तीचा डांगोरा पीटला.त्या माऊलींच्या कार्तिकी सोहळ्यात आजही वारकरी पायी चालून आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी जात आहेत.ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता वारकरी भगवंत भेटीसाठी अखंडपणे नामस्मरण करत माऊलींच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र आळंदी येथे जात आहेत. वारकरी संप्रदायाची ही महान परंपरा आजही महाराष्ट्रात रुजू आहे.महाराष्ट्राची दिंडी ही महान संस्कृती आहे.असे प्रतिपादन स्व.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी केले आहे. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे श्री नवनाथ पायी दिंडी सोहळा “श्रीक्षेत्र निमगाव वाघा ते श्रीक्षेत्र आळंदी” या पायी दिंडीचे रथाचे पूजन स्व.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.याप्रसंगी विणेकरी राम महाराज जाधव यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माऊली महाराज मोकासे,श्री नवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष एकनाथ डोंगरे,बन्सी जाधव,लक्ष्मण चौरे,शिवाजी बोडखे,लता फलके, चंद्रकांत जाधव,बाळू बोडखे,संताराम जाधव,सुमन फलके,हौसाबाई सोनवणे, नारायण जाधव ,महादेव निमसे,श्रीरंग आतकर,बबन टकले,भास्कर फलके, विजय जाधव, बन्सी शिंदे,गुलाब जाधव आदीं सह निमगाव वाघा येथील ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
राम महाराज जाधव म्हणाले, सालाबाद प्रमाणे “श्रीक्षेत्र निमगाव वाघा ते श्रीक्षेत्र आळंदी” या दिंडीचे प्रस्थान आज होत आहे.प.पु. ह्दयनिवासी ब्रह्मनिष्ठ ह.भ.प.विठ्ठल महाराज देशमुख (आळंदी),निष्काम कर्मयोगी वै. ह.भ.प.बाळकृष्ण महाराज भोंदे व यांच्या आशिर्वादाने तसेच ह.भ.प.विठ्ठल महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाने हा दिंडी सोहळा पार पडत आहे.