
दत्ता ठुबे
नगर- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये अटीतटीचे सामने रंगले व चुरस निर्माण झाली होती.या नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये बुर्हानगर येथील श्री बाणेश्वर विद्यालयाने बाजी मारली.तर मुलींच्या गटामध्ये चास येथील श्री नृसिंह विद्यालयाने बाजी मारली. नगर तालुका क्रीडा समितीच्या वतीने प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी देऊन बानेश्वर विद्यालय व नृसिंह विद्यालयातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे व उपाध्यक्ष तथा स्पर्धा संयोजक पै.नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, पैलवान महेश लोंढे,शुभांगी धामणे,मंदा साळवे बाळासाहेब बोडखे,आशिष आचारी,राजेंद्र वारुळे आदींसह पंच गणेश जाधव,भाऊसाहेब जाधव, रमाकांत दरेकर,मल्हारी कांडेकर,अँड.समीर पटेल आदींसह क्रीडा शिक्षक उपस्थित होते. नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत विजयी खेळाडू पुढीलप्रमाणे 14 वर्ष,35 किलो गटात प्रथम क्रमांक-विशाल कुल्लाळ,द्वितीय -अर्जुन जाधव, 38 किलो गटात प्रथम- शिवम जाधव, द्वितीय -ओंकार थोरात,41 किलो गटात प्रथम -शरद दुसुंगे,44 किलो गटात प्रथम-अवधूत गोंडाळ,द्वितीय- संग्राम कार्ले,48 किलो गटात प्रथम-स्वराज पानसरे,द्वितीय-अनिकेत धाडगे-52 किलो गटात प्रथम-मयूर लिमगिरे,द्वितीय- अनुज बोडखे,57किलो गटात प्रथम-नंदू वारुळे,62 किलो गटात प्रथम-प्रथमेश कारले, द्वितीय-मोहम्मद पठाण,63 किलो गट प्रथम-आदेश चोरमले, 68 किलो गटात प्रथम-वीरेन लांडगे,75 किलो गटात प्रथम- शौर्य पोळ तसेच14 वर्ष मुली 54 किलो गटात प्रथम-ज्ञानेश्वरी भांबरकर,46 किलो गटात प्रथम भाग्यश्री कारले,42 किलो गटात प्रथम-गायत्री खामकर,39 किलो गटात प्रथम-अर्पिता झेंडे,17 वर्षे ग्रीको रोमन मुले 41 ते 45 किलो गट प्रथम-आदित्य खांदवे,48 किलो गट प्रथम- प्रवीण मेहत्रे, 55 किलो गट प्रथम -उत्कर्ष कर्डिले,द्वितीय-तुषार वाळके,60 किलो गट प्रथम-सुरेश हजारे,65 किलो गट प्रथम-ओंकार जाधव, द्वितीय अथर्व मेढेवार,71 किलो गट प्रथम स्वयं चौरे,80 किलो गट प्रथम-भरत कांडेकर,19 वर्ष (फ्री स्टाइल) प्रथम-सिद्धार्थ कर्डिले, द्वितीय दीपक शिर्के,19 वर्ष 61 किलो गट प्रथम-दिनेश माळशिकारे,19 वर्षे ग्रीको प्रथम- विजय फुलमाळी ,17 वर्ष वयोगट मुली 46 किलो गट प्रथम-प्रतीक्षा दळवी,द्वितीय-धनश्री बटुळे,49 किलो गट प्रथम-साक्षी भिंगारदिवे 57 किलो गट प्रथम-समीक्षा कारले,द्वितीय-सरिता शेवाळे. 17 वर्षे (फ्रीस्टाइल) मुले 44 किलो गट प्रथम गौरव साळवे द्वितीय प्रियज कर्पे, 48 किलो गट प्रथम-सार्थक झांजे,द्वितीय- शिवराज शेंदूरकर,55 किलो गट प्रथम सुरज जाधव,द्वितीय- प्रताप गायकवाड,55 किलो गट प्रथम निखिल जाधव,द्वितीय- सुरज काळे,60 किलो गट सत्यम जाधव,द्वितीय-अनिल फुलमाळी, 65 किलो गट प्रथम सुरज चत्तर, द्वितीय-आदित्य शिंदे, 71 किलो गट प्रथम-अभय सातपुते, द्वितीय-प्रथमेश धाडगे, 80 किलो गट प्रथम-रोहित बोरुडे, द्वितीय-आदित्य गव्हाणे,92 किलो गट प्रथम-रोहन गुंजाळ,110 किलो गट प्रथम-ओम कोतकर कुस्ती स्पर्धेत या खेळाडूंनी बाजी मारली आहे. समारोप प्रसंगी पै.नाना डोंगरे म्हणाले,या कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा परिषद,नगर तालुका क्रीडा समिती व नवनाथ विद्यालय आदींचे सहकार्य लाभले आहे.आभार चंद्रकांत पवार यांनी मानले.
