
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
–अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात पोलिसांनी निघोज येथील लोळगे वस्तीवर छापा टाकत दीड लाखांचा गुटखा जप्त केला.
पारनेर तालुक्यातील निघोज येथील घरातून एक इसम संशयितरीत्या येथे गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तो इसम बाहेर येताना दिसला.पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासह पथकाने या स्वयंपाक घरात अक्षय लोळगे याने राहत्या घरी स्वयंपाक घरात गुटखा गोणीत भरून ठेवलेला होता. छापा टाकला असता पोलिसांनी गुटखा ताब्यात घेतला.या प्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सापडलेला गुटखा सुमारे ७८ हजार रुपये किमतीचा आहे.त्यानंतर दुसरा आरोपी चौधरी याच्या कारमध्ये सुमारे ५० हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला असून,तो पोलिसांनी जप्त केला.दोघा आरोपीं विरोधात भादंवि कलम ३२८, २७२, २७३, १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला .