कृषी

समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत मुरशेत, जहागीरदारवाडी येथे शेतकरी प्रशिक्षण

पर्यावरण संतुलन ठेवून आरोग्य संवर्धन करा – रामलाल हासे

एस. के. जाधव
कोकणवाडी( ता.अकोले ) /प्रतिनिधी


दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी, ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत आणि बायफ (BISLD), नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत मुरशेत, जहागीरदारवाडी येथे शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात निसर्गप्रेमी रामलाल हासे यांनी उपस्थितांना “झाडे लावा – झाडे जगवा, पर्यावरण संतुलन ठेवा, आरोग्य संवर्धन करा” असे तीन महत्त्वपूर्ण संदेश दिले. त्यांनी हादगा या नैसर्गिक रानभाजीचे मानवी आणि पशुधन आहारातील महत्त्व स्पष्ट केले. हादगा वनस्पतीत जीवनसत्व ‘अ’ आणि फायबर विपुल प्रमाणात असून, डोळ्यांचे विकार, वात–पित्त–कफदोष अशा अनेक व्याधींवर तो रामबाण औषध ठरतो. पान, फुल, शेंग, साल व मुळ यांचा औषधी उपयोग कसा करावा, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


हासे दांपत्याने हादग्याची रोपे स्वतः तयार करून शेतकऱ्यांना वाटप केली व लागवडीस प्रोत्साहित केले. तसेच म्हाळुंग पिकाचे औषधी गुणधर्म, जनावरांसाठी व मानवासाठी असलेले फायदे, तसेच म्हाळुंग पासून बनवलेले कॅन्डी आणि लोणचे याविषयीही माहिती देण्यात आली.


कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनकडून श्री. सिद्धार्थ अय्यर व श्री. अरुण बांबळे, तसेच बायफ (BISLD), नाशिककडून श्री. प्रदीप खोसे व श्री. सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या कार्यक्रमासाठी वर्षा भागडे, मारुती सगभोर,तारकराम रेड्डी व मार्टिकल मिथलू यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राम कोतवाल यांनी केले, तर श्री. विष्णु चोखंडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button