इतरराशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि १५/०९/२०२२

🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद २४ शके १९४४
दिनांक :- १५/०९/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३१,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति ११:०१,
नक्षत्र :- भरणी समाप्ति ०८:०५,
योग :- हर्षण समाप्ति २९:२७,
करण :- गरज समाप्ति २३:३५,
चंद्र राशि :- मेष,(१४:२८नं. वृषभ),
रविराशि – नक्षत्र :- सिंह – उत्तरा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ०८प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०१:५६ ते ०३:२७ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:१८ ते ०७:५० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२४ ते ०१:५६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:५६ ते ०३:२७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:५९ ते ०६:३१ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
षष्ठी श्राद्ध, दग्ध ११:०१ नं., यमघंट ०८:०५ नं.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद २४ शके १९४४
दिनांक = १५/०९/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
काम करताना मनात कोणतीही शंका आणू नका. व्यायामाचा कंटाळा करू नका. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. विद्यार्थ्यानी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा.

वृषभ
बोलण्यातील कटुता टाळा. जुन्या पुस्तकांचे वाचन कराल. मानसिक चंचलतेला आवर घालावी. शासकिय गोष्टींना मान्यता मिळेल. जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे.

मिथुन
बोलण्यातून समोरच्यावर छाप पाडाल. सरकारी कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. महत्त्वाच्या वस्तु सांभाळाव्यात. कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

कर्क
उत्तम वाहन सौख्य लाभेल. शांत विचाराने कामे पूर्ण करा. मुलां प्रतीच्या जबाबदार्‍या पार पाडाल. कामा निमित्त छोटे प्रवास घडतील. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका.

सिंह
आपल्या निर्णयावर ठाम राहाल. नम्रपणे बोलून आपला मान राखाल. राजकीय संपर्कातून लाभ होईल. जोडीदाराची मानसिकता समजून घ्या. धाकट्या भावंडाचे सहकार्य लाभेल.

कन्या
कामाचा ताण वाढता राहील. त्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या शोधात असणार्‍यांना दिलासादायक दिवस. व्यवसायिकांना संपर्कातून लाभ होईल. उत्तम स्त्री सौख्य लाभेल.

तूळ
आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. जवळचा प्रवास घडेल. हसत खेळत वागणे ठेवाल. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक
नातेवाईकांना नाराज करू नका. दिवस माध्यम फलदायी असेल. आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी. बोलण्यात माधुर्य ठेवल्यास कामे सुरळीत पार पडतील. समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे.

धनू
नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. व्यायामाचा कंटाळा करू नका. विरोधक नरमाईची भूमिका घेतील. नवीन व्यावसायिक संपर्क लाभदायक ठरतील. सासरच्या मंडळींकडून लाभ होतील.

मकर
समोरच्या व्यक्तीची साशंकता दूर कराल. आहाराची पथ्ये पाळावीत. धार्मिक बाजू भक्कम कराल. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील. जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न राहील.

कुंभ
नवीन ओळखी वाढवाव्यात. भागीदारीतील गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्या. मनातील इच्छा पूर्ण होतील. संयमाने कार्यरत राहाल. अचानक प्रवास संभवतो.

मीन
जुनी व्यावसायिक कामे मार्गी लागतील. अनावश्यक खर्च दूर ठेवा. मुलांच्या जबाबदार्‍या पार पडण्यात दिवस निघून जातील. काही कुरबुरी चर्चेतून दूर कराव्यात. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button