जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा उद्या आक्रोश मोर्चा

अकोले प्रतिनिधी
शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 9 /12 /2022 रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे
महाराष्ट्रातील शिंदे -फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टाचा अवमान करत जातचोर बोगस घुसखोरांना परत एकदा आधिसंख्य पदावर कायम करून संरक्षण देऊन आदिवासी समाजाच्या मुलांच्या तोंडातील घास काढून घेतला आहे. तसेच
धनगरांना आदिवासींमध्ये सामाविष्ट करू पहाणाऱ्या अन्यायकारक शिंदे-फडणवीस सरकारच्या अन्यायकारक निर्णयाचा जाहीर निषेध करण्यासाठी आदिवासी विचारमंच व बिरसा ब्रिगेड संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच वेळी शुक्रवार दि.09/12/2022 रोजी दुपारी ठीक 11ते 01 वाजता जनअंदोलनाद्वारे आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.
अकोले,राजूर,संगमनेर या परिसरात जास्त आदीवासी समाज असून संपूर्ण गावा गावातून सर्व बंधू-भगिनी,तरूणवर्ग, नोकरदारवर्ग, मातृशक्ती सर्वांनी शुक्रवारी दुपारी ठीक 11ते 01 वाजता अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन आदिवासी विचारमंच व बिरसा ब्रिगेड संघटनेने केले आहे
