इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि २८/०१/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ ०८ शके १९४३
दिनांक :- २८/०१/२०२२,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२०,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति २३:३६,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति २९:०७,
योग :- ध्रुव समाप्ति २१:४०,
करण :- बव समाप्ति १२:५९,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- मकर – श्रवण,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ११:१८ ते १२:४२ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:२९ ते ०९:५४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:५४ ते ११:१८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:४२ ते ०२:०७ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
षट्तिला एकादशी,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ ०८ शके १९४३
दिनांक = २८/०१/२०२२
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
घरातील वातावरण आनंदी राहील. मनासारखे काम करता येईल. घराची स्वच्छता ठेवाल. वैचारिक बाजू सुधारेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

वृषभ
जवळचा प्रवास मजेत पार पडेल. विरोधाला विरोध करू नका. भावंडांना मदत करता येईल. कंजूषपणा कराल. अचानक धनलाभ संभवतो.

मिथुन
आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक क्षण आनंदात जातील. सर्वांना आपलेसे करून घ्याल. गैरसमजाला खतपाणी घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

कर्क
आवडत्या गोष्टी कराल. आपली उत्तम छाप पडेल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. कामातून समाधान लाभेल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.

सिंह
मनाची चंचलता वाढेल. नामस्मरण करण्यात वेळ घालवावा. नसती काळजी करत बसू नका. कामातील विलंब दूर करण्याचा प्रयत्न करा. मुलांशी क्षुल्लक गोष्टींवरून वाद संभवतात.

कन्या
कर्तेपणाचा मान मिळवाल. मनातील इच्छेला प्राधान्य द्याल. भावंडांचा विरोध जाणवेल. उत्तम गृहसौख्य लाभेल. घरातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी.

तूळ
तुमच्यातील परोपकारीपणा दिसून येईल. आशावादी विचार मांडाल. सर्व गोष्टींकडे अभ्यासू नजरेने पहाल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. लेखकांना उत्तम लिखाण करता येईल.

वृश्चिक
आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल. मदतीचे समाधान कमवाल. कमतरता भरून निघायला मदत होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

धनु
अचानक धनलाभाची शक्यता. रेस,जुगार यातून लाभ संभवतो. मनाची चंचलता लक्षात घ्यावी. सामाजिक वादात लक्ष घालू नये. मनातील निराशा बाजूला ठेवावी.

मकर
पारमार्थिक उन्नती साधता येईल. मुलांकडे लक्ष ठेवावे. जोडीदाराचा प्रेमळपणा वाढीस लागेल. उत्तम भागीदार मिळेल. चार नवीन गोष्टी जाणून घेता येतील.

कुंभ
कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. चांगल्या लोकांचा सहवास लाभेल. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण होतील. जवळचे नातेवाईक भेटतील. व्यवहारी विचार कराल.

मीन
वैद्यकीय व्यवसायातील लोकांना चांगला लाभ होईल. विशेष अधिकार हातात येतील. घरातील लोकांची उत्तम साथ मिळेल. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button