नगर शहरातील संत किसनगिरी नगर येथे दत्त जयंती साजरी.

दत्ता ठुबे
नगर प्रतिनिधी :नगर शहरातील पाईपलाईन रोड भिस्तबाग येथील गुरुदत्त भक्तिधाम मध्ये दरवर्षी प्रमाणे भगवान दत्तात्रय जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
श्री दत्त जयंतीनिमित्त होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम हे श्री दत्तात्रयांच्या मंदिरामध्ये स्थानिक सेवेक-यांच्या उपस्थितीत पार पडला.आमदार संग्राम जगताप यांनी दत्त जयंती निमित्त गुरुदत्त भक्तीधाम येथे सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले.याप्रसंगी सदगुरू किसनगिरी बाबा भक्त मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री दत्तात्रय भगवान व श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या व प. पू. गुरुवर्य श्री. भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने साकारलेल्या गुरुदत्त भक्तिधाम संत किसनगिरीनगर येथील हे कार्यक्रमाचे पाचवे वर्ष होते. श्री दत जयंतीनिमित्त सकाळी 5 ते 8 नित्यपुजा व आरती, सकाळी 9. ते 12 अभंगावली गंथाचे पारायण, दर पौर्णिमेची महाआरती दुपारी 12 वा. हरिपाठ दुपारी 3.30 ते 4.30. श्री दत्त अवतार महिमा अंभग वाचन व प्रवचन हभप दुतारे महाराज यांनी केले.श्री दत्तात्रय भगवान जन्म सोहळ्यानंतर महाआरतीच्या नंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा नगर भक्तमंडळाच्या सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
