इतर
जेष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी यांचे निधन

अहमदनगर : ज्येष्ठ पत्रकार, समाचारचे मालक संपादक महेंद्र कुलकर्णी (वय ५५) यांचे ह्रदयविकाराने आज शुक्रवारी सायंकाळी निधन झाले.
त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दैनिक लोकसत्ताचे वार्ताहर ते लोकसत्ताचे निवासी संपादक आणि मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म असूनही प्रतिष्ठित सांय दैनिकाचे मालक संपादक असा त्यांचा प्रवास आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण यासह विविध प्रश्नांचा त्यांचा मोठा अभ्यास होता. यावर त्यांनी सातत्याने लेखन केले. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात त्यांचा मोठा संपर्क होता. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.