कंत्राटी भरतीचा जी आर रद्द करून शाळांचे खाजगी करणं ही रद्द करावे -राऊत

बीड:- महाराष्ट्रतील भाजप सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा जि. आर निर्गीमित कलेला होता सदर जिआर रद्द करण्या करीता सर्व स्तरावरून व राष्टीय जनसेवा पक्षा चे बीड जिल्हा अध्यक्ष दिलीप राऊत यांनी ही .मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते
राज्यातून या जी आर ला मोठा विरोध होत होता अखेर महाराष्ट्र उपमुखमंत्री श्री देवेद्र फडणवीस यानी दिनाक 20-10-2023 रोजी कंत्राटी नोकर भरती जि.आर रद्द केल्याचे घोषित केले परंतु तसा जीआर रद्द केल्याचा सुधारित जीआर निर्गमित केलेला नाही.
तसेच कंत्राटी नोकर भरती जि.आर रद्द केला पण सरकारी शाळेचे खाजगीकरण रद्द केल्याचे घोषित केलेले नाही. सरकारी शाळेचे खाजगीकरण रद्द करणे अवश्यक आहे. व खाजगी शाळा व क्लासेस बंद करणे आवश्यक आहे..
नोकर भरती ही पूर्व प्रमाणे वर्ग 3 व ४ ची पदे समाजकल्याण / एम्प्लामेंट याच्या मार्फत थेट मुलाखती द्वारे भरावीत. असे राष्टीय जनसेवा पक्ष बीड जिल्हा अध्यक्ष दिलीप राऊत यांनी म्हटले आहे .