शिक्षकांचा दृष्टिकोन विद्यार्थी भिमुख असायला हवा -शशांक खरमाळे

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
न्यू आर्ट्स कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयामध्ये गणित दिवसानिमित्त गणित विषयाचे माजी विद्यार्थी संस्थापक व चेअरमन गुरु अॅकॅडमी शशांक खरमाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी ते म्हणाले, 22 डिसेंबर हा दिवस थोर गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्मदिन संपूर्ण देशात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर या महाविद्यालयामध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना शशांक खरमाळे म्हणाले, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सर्वच महाविद्यालयातील शिक्षक हे विद्यार्थीभिमुख दृष्टिकोन असणारे आहेत. येथे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात मित्रत्वाचे नाते आहे. येथे प्राध्यापकांच्या अध्यापनामध्ये, अभ्यासामध्ये दूरदृष्टी आहे. येथे परीक्षा या गुणांसाठी नाही तर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून घेतल्या जातात. गणित विषयातील विविध संधीविषयी विद्यार्थ्यांना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, आज विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. गणित विषयाचे विविध क्षेत्रात असलेले महत्त्व या विषयी विद्यार्थ्यांना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी गणित दिन मोठ्या उत्साहात मध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये107 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे संयोजन प्रा.नूतन मांडगे, वर्षा गाढवे, ऋतुजा रोहोकले, अश्विनी सातपुते, भारती येणारे, आसिया तांबोळी, शुभांगी काळोखे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.राणी सोनवणे यांनी केले.आभार प्रा.नूतन मांडगे यांनी मानले.