इतर
खासदार लोखंडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने मुकबधिर विद्यालयात मिठाई वाटप

अकोले प्रतिनिधी
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे कार्यसम्राट खासदार श्री सदाशिवराव लोखंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना अकोले शहर प्रमुख उपक्रमशिल नेतृत्व श्री गणेश कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना अकोले शहर च्या वतीने अकोले येथील मूकबधिर विद्यालयातील निवासी मुलां- मुलींना पावभाजी व मिठाईचे वाटप करण्यात आले
याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख महेशराव देशमुख, अकोले तालुकाप्रमुख संजय वाकचौरे, अकोले शहर संघटक बाळासाहेब धुमाळ, सुनीलशेठ कोळकर, अनिल ढेकणे, संतोष शेठ कोळपकर ,निलेश दिवटे,किरण करपे, जाकिरभाई सय्यद, बाळासाहेब भोर, शैलेश घोडके,प्रतिक धुमाळ, संग्राम कानवडे, अभिषेक धुमाळ, व विद्यालयातील शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते
मूक बधिर विद्यालयातील मुलांनी केक कापून आनंद साजरा केला व खासदार साहेबांना निरोगी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या….!
