राष्ट्रीय सेवा योजनेतूनच विद्यार्थी घडतात पो. उपनिरीक्षक. जैनुद्दीन शेख

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी समाजऋण फेडावे विद्यार्थी जीवनात आपल्याला कोणते ना कोणते ऋण फेडावे लागते त्यापैकी एक ऋण म्हणजे समाजसेवेची असते हे ऋण फेडण्याच्या काम आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करता येते तसेच विद्यार्थ्यांनी वाईट मार्गाचा न स्वीकार करता गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. असे प्रतिपादन राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. शेख साहेब यांनी केले.
राजुर येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देवगाव ता.अकोले येथे राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन झाले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जैनुद्दीन शेख ,कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भाऊसाहेब देशमुख होते राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीर आयोजित केले होते.सदर ठिकाणी रेझिंग डे निमित्त भेट माहिती दिली .राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेले विद्यार्थीनी यांना पो.ना वाडेकर यांनी महिलांविषयी कायद्या बाबद सविस्त्तर माहिती सांगितली तसेच डाईल 112 बाबद माहिती सांगितली. तसेच पोलीस उपनिरीक्षक जैनुद्दीन शेख यांनी विद्यार्थ्यांना वेसनमुक्ती बाबत माहिती देऊन कायदेविषयक मार्गदर्शन केले
शेख यांनी विद्यार्थी दशेतेच संस्कार क्षम पिढी घडते आजच्या विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी मार्गाचा अवलंब न करता चांगले संस्कारक्षम बनवावे व आपले भविष्य उज्वल बनावे असे मत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी देवगाव गावचे सरपंच महासचिव भांगरे वाळू डॉ.व्ही.एन. गीते,डॉ.दीपमाला तांबे, प्रा सुलोचना धिंदळे, प्रा ढगे मॅडम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा तेलोरे बी.एच.तसेच ग्रामस्थ देवगाव उपस्थित होते. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.एल बी काकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बी.के.थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.एस.आर.अस्वले यांनी केले.
