विज्ञान प्रदर्शन हे सर्जन शिलतेला वाव देणारे- :प्रकाश टाकळकर

राजूर येथे तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्षण संपन्न.
सर्वोदय विदया मंदिर खिरविरे फिरता चषकचे मानकरी.
अकोले/ प्रतिनिधी-:
विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्याच्या सर्जन शीलतेला वाव देणारे आहे. शाळेच्या भिंती बाहेर चे उपक्रम हे प्रेरणा देणारे असते असे प्रतिपादन माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर यांनी केले. जिल्हा परिषद अहमदनगर ,पंचायत समिती अकोले व अकोले तालुका गणित विज्ञान संघटना यांच्या वतीने 50 वे तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शन राजुर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुर येथे पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानाहून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजूरचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील बारसे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्य नामदेव झरेकर, प्रभारी गट शिक्षणाधिकारी.जालिंदर खताळ, विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे,सविता कचरे ,राजूर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य टी एन कानवडे, स्वामी समर्थ सेवा संस्था राजुरचे सचिव शांताराम काळे, स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा काळे,
सत्यनिकेतन संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश महाले,गणित विज्ञान संघटनेचे अध्यक्ष सतीश काळे , शाम मालुंजकर व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना टाकळकर पुढे म्हणाले की-
शाळेच्या व्यासपीठावर मिळणारे बक्षीस हे तुम्ही कधीही विसरू शकत नाही.कला क्रीडा यातील सहभागापेक्षा विज्ञान प्रदर्शनातील सहभाग हा वेगळा असतो.विज्ञान प्रदर्शन विचार प्रक्रिया करायला लावणार आहे .जीवनात पुढे जायचे असेल तर तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे. त्यासाठी बोलायला शिका प्रश्न विचारायला शिका. तुमच्यातील गुतहूल जागृत झाले पाहिजे. विज्ञान प्रदर्शन तुमच्या जीवनातील सर्जनशील त्याला वाव देणारे आहे.जीवनाचा सर्व क्षेत्रात आपण प्रगती केली आहे ती विज्ञानाची का धारण केली आहे .आपला देश आज अन्नधान्य धान्य प्रगतशील आहे त्यासाठी विज्ञान कारणे होत आहेत आज या ठिकाणी तुम्हाला जरी वाव मिळाला नसला तरी पुढे अनेक संधी तुम्हाला उचलत आहे विज्ञानाला असलेले मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध असणारी आपण प्रगती केली आहे प्रदर्शन पुणे मार्ग प्रदर्शन पुरते मर्यादित न राहता आपल्या भागातील गरजा पुरवण्यासाठी संशोधन करण्याची गरज आहे.
या प्रदर्षणात सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयातील बेणके तुषार यास विज्ञान गटातून भात झोडणी यंत्रास प्रथम क्रमांक, डगळे पुजा ९ते १२मध्ये गणित गटातुन तृतीय क्रमांक तर शिंदे सार्थक६ते ८ गटातुन शेंगा तोडणी यंत्रास चतुर्थ क्रमांक मिळाल्याने सर्वोदय विदयालय फिरता चषकचे मानकरी ठरले.
यावेळी प्राचार्य मंजुषा काळे, डॉक्टर सुनील बारसे. आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ यांनी केले तर अहवाल वाचन विज्ञान संघटनेचे अध्यक्ष सतीश काळे यांनी केले. सूत्रसंचालन किरण भगत यांनी केले तर आभार प्राचार्या सौ.मंजुषा काळे यांनी मानले.
———