पारनेर तालुक्यातील देसवडे काळेवाडी येथील ग्रामस्थांनी दाते सरांची केली पेढेतूला!

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील देसवडे काळेवाडी येथील ग्रामस्थांनी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व सभापती काशिनाथ दाते सर यांचा पेढेतुला कार्यक्रम आयोजित प्रसंगी ह भ प दत्त गिरी महाराज यांचे प्रवचन आयोजित केले होते यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
सत्काराला उत्तर देताना सभापती दाते सर म्हणाले ही वाडी माझ्या नातेगोत्याची आहे. अगदी लहानपणापासून या वाडीवर मी प्रेम केलं आहे आणि जेथे मला संधी मिळेल त्या संधीच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांच्या ज्या गरजा आहेत ते विकासाचे काम केले आहे. औटी साहेबांच्या माध्यमातून हा सभामंडप असेल, दळणवळणाच्या दृष्टीने वाडीकडे येणारे तीन घाट रस्ते आपण करून दिले. आणि चौथा जावळदाऱ्याचा घाटही मीच करून देणार, काळजी करू नका मी गेल्या ४० वर्ष या परिसरात असेल, तालुक्यात पायाला भिंगरी लावून फिरतोय या विभागाच्या प्रश्नांची जाण मला आहे. त्याच प्रयत्नाच्या माध्यमातून आज या परिसरामध्ये कोणीही बाहेरून आल्यास येथे झालेले दळणवळणासाठीचे रस्ते, येथील शाळा खोल्या, अंगणवाडी इमारती, ग्रामपंचायत कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाने, आरोग्य केंद्राला दिलेल्या निधी या सगळ्या कामांची नोंद घेतल्याशिवाय राहत नाही.चांगले काम करणारे लोकांना भावतातच असे नाही पण तरीही चांगल्या लोकांनी थांबायचे नसते काम करत राहायचे या विचाराचा मी आहे. या वाडीच्या महिला दोन दोन हांडे डोक्यावर घेऊन डोंगर उतरून खाली पाण्यासाठी जात होत्या. परंतु आज या वाडीत ऊस, टॉमेटो, तरकारीच्या गाड्या भरून जातात, सगळा परिसर बागायत झालाय हे सर्व ह्या रस्त्यांमुळे घडले आहे. तुमचा सर्वांचा विकास करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. त्यामुळे सातत्याने कामात राहणे आणि जेथे संधी मिळेल तेव्हा लोकांचा विचार करत राहण्याचा माझा प्रयत्न आहे.
खोटे बोलून जनतेला भुलविणारे उघडे पडतील
कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास भोसले म्हणाले तालुक्यात खोटे बोलून लोकांना भुलवणारे लवकरात उघडे पडणार आहेत. मागील कित्येक दिवसापासून पाणी आणण्यासाठी भुलथापा दित आहेत. आता यापुढे लोक फसणार नाहीत. असं गाव नसेल की मागणी केली आणि दाते सरांनी काम दिले नाही. करोडो रुपयांची विकास कामे सरांनी केलेत त्यामुळे भुलथापांना बळी पडू नका काम करणाऱ्यांच्या मागे उभे रहा. यावेळी प्रियंका खिलारी, साहेबराव वाफारे, पंढरीनाथ उंडे, कैलास न-हे, माजी चेअरमन भाऊसाहेब टेकुडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

- परिसरातच नव्हे तर संपूर्ण पारनेर तालुक्यात लाभलेले एक रत्न, की ज्यांच्या विचारातच, तालुक्याचे आगळ वेगळं स्वप्न आहे. आणि बऱ्याच अंशी ते कृतित उतरवले आहे. असे आपले सर्वांचे दाते सर, खरंतर हा जो तुम्हाला पुरस्कार दिला जातोय, एखाद्या संस्थेने, शासनाने किंवा ट्रस्टने दिलेल्या पुरस्कारापेक्षा खूप मोठा आहे. सामान्य जनतेला जेव्हा एखाद्या व्यक्तीचे महत्त्व वाटते, लोकप्रतिनिधी कसा असावा ज्यांच्या विचारात संयम, अभिजात दिव्यत्व, शांतता, असे आदर्श व्यक्तीमत्व आपल्याला लाभलेले दाते सर. त्याचेच पेढेतुला प्रतीक आहे.
- ह. भ. प. बाबासाहेब शिंदे,
- (माजी सरपंच वडगाव सावताळ)
यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियंका ताई खिलारी, उप तालुकाप्रमुख पंढरीनाथ उंडे, शेतकरी आघाडी प्रमुख कैलास नऱ्हे, युवा उप तालुकाप्रमुख शुभम टेकुडे, कर्जुले हर्या माजी सरपंच साहेबराव दादा वाफारे, वडगाव सावताळ माजी सरपंच बाबासाहेब शिंदे, माजी चेअरमन भाऊसाहेब टेकुडे, सरपंच पोपटराव दरेकर, उपसरपंच सचिन भोर, अमोल पवार, बाजीराव शिंदे, किशोर टेकुडे सर, राजु गुंड, संपत तोरकड, शिवाजी दाते, गणपत शिंदे, शिवाजी गुंड, धोंडीभाऊ दाते, गोविंद औटी, मच्छिंद्र गुंड, संतोष दाते, महादू वाळुंज, रोहिदास कानडे, दिगंबर टेकुडे, योगेश दाते, सोपान दाते, दत्ता टेकुडे, शिवाजी टेकुडे, विनायक टेकुडे, संजय टेकुडे, सुरेश शिंदे, गणपती तोरकड, प्रदीप गुंड, जालू दाते, बाबासाहेब दाते, प्रदीप टेकुडे, जिजाभाऊ टेकुडे,संजय काशिद, अशोक खैरे, उत्तम भोर, दत्ता फटांगरे, संतोष टेकुडे, चेअरमन कारभारी टेकुडे, गणेश बेलकर, संपत काशिद, दिनकर टेकुडे, भाऊसाहेब कारभारी टेकुडे, बबन गुंड, शिवाजी दाते, धोंडीभाऊ दाते, शिवाजी टेकुडे, पंकज औटी,सुरेश शिंदे, सुयोग दाते, राजू गुंड, दिपक गुंड, भानुदास तोडकर, सुरेश तोडकर, नानाभाऊ दाते, लहानु औटी, रवी तोडकर, रभाजी टेकुडे, योगेेश दाते, गंगाराम टेकुडे, बाबाजी गुंड, सोमनाथ तोरकड, संतोष टेकुडे, डॉ. अशोक टेकुडे, सतीश दाते, उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग गुंड यांनी केले तर आभार संपत तोडकर यांनी मानले.