इतर
जखणगांव येथे आज मोफत आरोग्य शिबिर!
अहमदनगर – कै.गोपाळकृष्ण गंधे (बंडुकाका) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २३रोजी सकाळी १० ते २ जखणगांव(गंधे वाडा) येथे माणसे जनावरे व जमीन यांच्या आरोग्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
या शिबिरात संधीवात,मेंदुविकार, दमा,बिपी,मधुमेह, मणके,कॅन्सर, स्रीरोग,डोळ्याची तपासणी व ऑपरेशन तसेच चष्मे ,बालरोगतज्ञ अशा सर्व तपासण्या व उपचार मोफत करण्यात येणार आहेत .सर्व पेशंट चे बीपी, शुगर, ईसीजी, कॅन्सर स्क्रिनिंग आदि तपासण्या मोफत केल्या जातील तसेच उपचार मोफत करण्यात येईल तरी परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनकरण्यात आले आहे