ज्ञान नसणाऱ्या सरपंचांनी सभापती दाते यांच्यावर टीका करू नये : भाऊसाहेब डोंगरे

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काताळवेढा ता. पारनेर येथील डोंगरवाडी नळ पाणीपुरवठा योजना करणे या (१४३.२२ लक्ष) कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे व कृषी समिती सभापती काशिनाथ यांच्या शुभहस्ते झालेले असताना सरपंच पियुष गाजरेंनी आपली लायकी नसताना सभापती दाते यांच्यावर केलेली टीका करताना कुठल्याही स्वरूपाची माहिती घेतलेली नाही असे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब डोंगरे म्हटले आहे.
डोंगरवाडी नळ योजनेचा सर्वे करताना मी स्वतः अधिकाऱ्यांबरोबर होतो. वास्तविक पाहता जल जीवन मिशनचा जिल्ह्याचा आराखडा दोन वर्षांपूर्वीच मंजूर केलेला आहे त्यावेळेस हा गावचा सरपंच सुद्धा नव्हता. त्यानंतर पुरवणी आराखडा होतो, पुरवणी आराखड्यास तत्वतः मान्यता दिली जाते आणि त्याची तांत्रिक मान्यता झाल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मान्यता दिल्या जातात आणि त्या समितीमध्ये जिल्हा परिषद अहमदनगरचे ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता सचिव म्हणून असतात. या योजनेस केंद्र सरकारचा ५० टक्के निधी असून राज्य शासन ५० टक्के निधी जिल्हा परिषदेला योजनेसाठी खर्च करण्यासाठी दिले जातात. ही सर्व माहिती न घेता सरपंच गाजरे यांनी सभापती दाते यांच्यावर टीका करणे म्हणजे उंटाचा मुका घेण्यासारखे आहे. आपण बोलतो काय, आपला आवाका किती, टीका करतो कोणावर, आपली लायकी किती! दोन वर्षांत, आपल्या झालेल्या सरपंच कालावधीत जिल्हा परिषद वगळता आपण गावच्या विकासासाठी काय दिवे लावले हे पहावे, आपले काम जनतेला सांगावे, ज्या सभापती दाते यांनी तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली त्यांच्यावर टीका करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ दाते सर २०१७ पासून जिल्हा परिषद मध्ये आहेत. जिल्ह्याचा आराखडा तयार होत असताना जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या आराखड्यास जिल्हा परिषदेचे सदस्य त्या त्या गटातील योजनेसाठी शिफारशी देत असतात. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभागृहात या विषयावर चर्चा झालेल्या असतात. आपण सरपंच म्हणून गावच्या विकासाकडे लक्ष द्यावे.
एवढीच मापक अपेक्षा आमच्या सारख्या डोंगरवाडी मधून निवडून आलेले तीनही ग्रामपंचायत सदस्यांची आहे. असे माजी सरपंच ठकाशेठ कडूसकर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी डोंगरे, ग्राम दिपाली लामखडे, सोपान डोंगरे यांनी म्हटले आहे.