निघोज-पिंपरी जलसेन परिसरात वाळु उपसा करणारे यंत्र, डंपर जप्त, पारनेर महसुलची मोठी कारवाई!

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पिंपरी जलसेन परिसरातील येथील खार ओढा परिसरात अवैध गौण खनिज खोदणारे वाहतूक करणारे डंपर वर तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईतील डंपरला २ लाख १० हजार रुपये दंड ठोठावला असून पोकलॅनला पण दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन ते निघोज रस्त्यालगत खार ओढा या ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतुक सुरू असल्याची माहीती मिळाल्यानंतर तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार सुभाष कदम, मंडळ अधिकारी ए.बी.पोटे, तलाठी ए.टी गोरे, पोलीस अमंलदार सुरज कदम, विवेक दळवी यांच्या पथकाने भेट दिली असता तेथे अवैध रित्या वाळु भरलेला डंपर व पॉकलॅन मशीन आढळून आले. सदर वाहने जप्त करून पोलिस बंदोबस्तात तहसिल कार्यालय पारनेर येथे आणण्यात आली व पुढील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.