इतर

महिला दिनानिमित्त अळकुटीत महिलांचा सन्मान , महिला भारावल्या

दत्ता ठुबे

पारनेर – अळकुटीच्या अभ्यासू सरपंच डॉ . कोमल भंडारी यांनी महिला दिनाचे औचित्य साधत महिलांना भव्य मेळाव्या व्दारे एकत्र आणत अळकुटी परिसरातील महिलांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान केला . महिला ही भारावून गेल्या.
पारनेर तालुक्याच्या इतिहासात अळकुटी सारख्या ग्रामीण भागात महिला सरपंचांनी महिला दिनाचे औचित्य साधत शेतकरी , कष्टकरी , कामकरी , व्यावसायिक , नोकरदार महिलांना मोठ्या संख्येने एकत्रित आणल्या


यावेळी सरपंच डॉ.कोमल भंडारी यांच्या वतीने अळकुटी परिसरातील डॉ.सरिता खोसे, डॉ.रेश्मा गुंड यांना वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गुण गौरव पुरस्कार , तर अंजनाबाई शिरोळे , कमलबाई हांडे , कांताबाई शिंदे , इंदूबाई जाधव , हिराबाई शिरोळे ,रंजना परंडवाल , कांताबाई परंडवाल , मीराबाई शिंदे , मीनाताई भंडारी , इंदुबाई भंडारी , सुनीता बेलकर , हिराबाई पुंडे , मुमताज पटेल अलकाबाई साखला , वंदना पोखरकर , लंकाबाई घोलप या महिलांना शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.या महिला मेळाव्याला अळकुटी ग्रामपंचायत सदस्या लताबाई घोलप , सारिका शिरोळे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हा महिला मेळावा आयोजित करून सरपंच डॉ.कोमल भंडारी यांनी महिलांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांच्या चाकोरी बद्ध जीवनातून सन्मान पुर्वक समाजापुढे आणल्याने व त्यातल्या त्यात काही महिला तर प्रथमच महिला मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांत मोठ्या महिलांच्या गर्दीत व ते ही व्यासपीठावर उपस्थित झाल्याने या सन्मान मूर्ती महिला अक्षरशः भारावल्या


तालुका वा जिल्हा पातळीवर नेते व अधिकारी महिलांना विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्रित आणतात , पण तेथे ही महिलांची संख्या मोजकीच असते.अळकुटी सारख्या पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील महिला सरपंच डॉ.कोमल भंडारी यांनी मनाचा मोठे पणा दाखवत अति प्रचंड महिला मेळाव्याच्या निमित्ताने महिलांचा सन्मान घडवून आणल्याने पारनेर तालुक्यातील इतिहासात या महिला मेळाव्याची नक्कीच नोंद घ्यावी लागेल .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button