
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील मौजे कांबी येथील शेतीपंपाचा विज पुरवठा वारंवार अखंडित व अनियमित होत असल्याने सदरचा वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करू या मागणीचे निवेदन जनशक्ती विकास आघाडीच्या मा.जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली म.रा.वि.वि.कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री.एस.एम.लोहारे यांना दि.२७/०२/२०२३ रोजी देण्यात आले होते. परंतु तरी देखील यामागणीकडे दुर्लक्ष केल्याने जनशक्ती विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी व कांबी येथील शेतकरी यांच्या वतीने चापडगाव सबस्टेशन येथील कार्यालयासमोर आज दि.(०८) रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. उपकार्यकारी अभियंता एस.एम.लोहारे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी लेखी निवेदनात म्हंटले आहे की, हातगाव सबस्टेशन मधून निघणारे ११ के.व्ही. हातगाव शेती फिडर ओव्हरलोड होत असल्याने फिडर दोन टप्प्यात चालवले जात आहे. या फिडरवर हातगाव व कांबी या दोन गावातील शेतीपंप ग्राहकांचा लोड आहे. अशातच पाटाला पाणी आल्याने लोड वाढला असून सदरील फिडरवरील काही लोड मुंगी फिडर व काही चापडगाव फिडरवर टाकून तात्पुरते नियोजन करून एक टप्पा सुरळीत केला आहे. हातगाव सबस्टेशनमध्ये नवीन ट्रान्सफार्मरसाठीचे इस्टीमेट वरिष्ठांना पाठवले असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल. डी.पी.डी.सी. इ.सी.एफ.इ. योजनेंतर्गत मंजुरीबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. सध्या नवीन ट्रान्सफार्मर व लिंक लाईनचे काम आर.डी.एस.एस. योजनेतर्गत मंजूर आहे. या योजनेअंतर्गत सदर प्रस्तावित काम आवश्यक प्रक्रिया झाल्यानंतर चालू करण्यात येणार आहे. नवीन १० पोलचे लिंक लाईनद्वारे हातगाव व कांबी हे दोन टॅब स्टेशनमधून चालू बंद करण्यासाठी प्रस्तावित केले असून याचे काम येत्या १५ दिवसात पूर्ण होणार असल्याचेही या लेखी निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे बाबासाहेब म्हस्के, अकबर भाई शेख, राजू जिजा पातकळ, आबासाहेब काकडे, बाजीराव लेंडाळ, वंचितचे प्यारेलाल शेख, विश्वास गावडे, तुषार काळे, बळीराम म्हस्के, भाऊसाहेब झिरपे, राजेंद्र लेंडाळ, गोविंद नरके, विठ्ठल मगर, कैलाश चोरमले, विनायक चोरमले, दिपक घोलप, गणेश होळकर, रामदास विखे यांच्यासह असंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते.