इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१३/०१/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २३ शके १९४७
दिनांक :- १३/०१/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:११,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति १५:१८,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति २४:०७,
योग :- शूल समाप्ति १९:०५,
करण :- बव समाप्ति २८:३७,
चंद्र राशि :- तुला,(१७:२१नं. वृश्चिक),
रविराशि – नक्षत्र :- धनु – उतराषाढ़ा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशीप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- विशाखा वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:२४ ते ०४:४७ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहुर्त — सकाळी ११:१५ ते १२:३८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३८ ते ०२:०१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:२४ ते ०४:४७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भोगी, धनुर्मास समाप्ति, घबाड १५:१८ प., भद्रा १५:१८ प.,
————–

मकर संक्रांत आणि उपवास शंका समाधान.

दि. १४ जानेवारी २०२६ रोजी बुधवारी मकरसंक्रात आहे त्याच्या पुण्यकाल दुपारी ३ ते सूर्यास्त पर्यंत आहे.
पुण्यकाळात म्हणजे दुपारी ३ ते सुर्यास्त पर्यंत
संक्रांतीचा वाण वसा करावा. एकादशीला तिळगुळ खाता येतो, देवतांना उपवास नसतो त्यामुळे नेहमी प्रमाणे भोजनाचा नैवेद्य करता येईल.ज्यांना उपवास नाही त्यांनी भोजन करते वेळी तो प्रसाद घ्यावा. सर्वांना उपवास असेल तर तो नैवेद्य थोड्या प्रमाणात करुन गाईला द्यावा.

मकर संक्रांत २०२६ संक्रांतीचा पुण्यकाल

– १४ जानेवारी २०२६ बुधवारी दुपारी ०३ वा. ०६ मि. पासून सूर्यास्तापर्यंत आहे. शके १९४७ पौष कृ. ११ बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ०३ वा. ०६ मी. सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे.वाहन – वाघ, उपवाहन घोडा. पिवळे वस्त्र परिधान केले आहे. हातात गदा घेतलेली असून केशरचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी
असून बसलेली आहे. वासाकरिता जाई घेतलेली
असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती
असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे.पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे.दाने नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र,
गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा, इत्यादी यथाशक्ती दाने करावीत. एकादशीला तिळगुळ खाता येतो.

:-14 जानेवारी 2026 फक्त
संक्रांत नाही..!!

१४ जानेवारी २०२६ हा दिवस केवळ मकर
संक्रांतीचाच नाही तर षट्ठीला एकादशीचा
देखील आहे. या दिवशी एक मोठा योगायोग
घडणार आहे कारण षट्ठीला एकादशी आणि
मकर संक्रांती या दिवशी एकत्र येणार आहेत,
त्याआधी हा योगायोग अकरा वर्षांपूर्वी
म्हणजे २०१५ मध्ये घडला होता.
या दिवशी तुम्हाला जास्त काही करण्याची
गरज नाही, फक्त आंघोळीच्या पाण्यात पांढरे
तीळ घालून आंघोळ करा आणि भगवान
विष्णूला तीळ आणि गूळ अर्पण करा, मनात
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः चा जप
करा, तुमचा उद्धार होईल, या दिवसापासून
तुमचे काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल.

वेदमुर्ती / ज्योतीष सल्लागार
श्री. प्रशांत (देवा) कुलकर्णी रा. जेऊर ता. करमाळा जि. सोलापुर.

संदर्भ- दाते पंचांग

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २३ शके १९४७
दिनांक = १३/०१/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
चोरांपासून सावध राहावे. विरोधकांचे दडपण राहील. कामाचा ताण जाणवेल. मनाचे औदार्य दाखवाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.

वृषभ
वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. वादात अडकू नये. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. अचानक धनलाभाची शक्यता. प्रकृतीची काळजी घ्यावी.

मिथुन
घरगुती जबाबदारी समर्थपणे पेलाल. खर्चाकडे लक्ष द्यावे. हातातील अधिकार वापराल. तुमचा मान वाढेल. कामाचा जोम वाढेल.

कर्क
भावनेला आवर घालावी लागेल. काही कामे वेळ काढतील. कामाची जबाबदारी वाढू शकते. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. अडथळ्यातून मार्ग काढाल.

सिंह
शारीरिक कष्ट वाढू शकतात. कार्यप्रविणता दाखवाल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. भावनेच्या भरात बोलतांना सारासार विचार करूनच बोलावे. डोकेदुखी सारखे त्रास जाणवू शकतात.

कन्या
सामुदायिक वादात अडकू नका. प्रवासात काळजी घ्यावी. व्यावसायिक लाभाचा अधिक विचार कराल. मोठ्या लोकांच्या संगतीत रमाल. कोर्टाची कामे निघतील.

तूळ
कामाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करावा. अनुदानाची कामे होतील. . कलागुणांना चांगला वाव मिळेल. सरकारी कामात विशेष लक्ष घालावे.

वृश्चिक
औद्योगिकदृष्ट्या सतर्कता ठेवावी. वरिष्ठांशी बोलतांना नरमाई ठेवावी. गुरुकृपेचा लाभ होईल. मनाजोगी संगती लाभेल. वडिलधाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

धनू
मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. प्रवासात सावधानता बाळगावी. शांतपणे विचार करून ते कृतीत आणाल. आवडत्या गोष्टी कराल. दुचाकी वाहन चालवितांना सतर्क राहावे.

मकर
एकाच गोष्टीवर अडून राहू नका. मानसिक शांतता राखावी. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. कौटुंबिक सौख्याचा विचार करावा. खर्चाचा विचार करावा.

कुंभ
पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोर्टाची कामे पुढे ढकलावीत. जोडीदाराचे म्हणणे समजून घ्यावे. कामे मनासारखी पार पडल्याने खुश असाल. चिडचिड करू नये.

मीन
गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी. अति भावनिक होणे टाळावे. आवडते छंद जोपासावेत.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button