इतर

वीज कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात जाणार नाही” — संचालक राजेंद्र पवार

: पुणे दि 18

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न – भारतीय मजदूर संघ) यांच्यावतीने महावितरण प्रशासनासोबत दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी बैठक संपन्न झाली.
या बैठकीचे अध्यक्ष महावितरणचे संचालक (मानव संसाधन) मा. राजेंद्रजी पवार यांनी केले.

बैठकीत प्रामुख्याने मनुष्यबळ पुनर्रचना (Restructuring) प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.
या संदर्भात संचालक मा. पवार यांनी स्पष्ट सांगितले की —
“पुनर्रचनेमुळे एकही कंत्राटी कामगार कमी होणार नाही, उलट 10% अधिक कामगारांची वाढ करण्यात येणार आहे.”

तसेच, न्यायालयाने संरक्षण दिलेल्या कंत्राटी कामगारांच्या नावांची यादी राज्यातील सर्व विभागांना पुन्हा पाठविण्यात येईल.
कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील, आणि शेवटी कामावर रुजू झालेल्या कामगारांनाच प्राधान्याने कमी केले जाईल, अशा सूचना फील्ड स्तरावर देण्यात येतील, अशी माहिती मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके यांनी दिली.

संघटनेने बैठकीत मांडले की — “राज्यात ज्यांच्या श्रमामुळे घराघरात उजेड आहे, त्या कामगारांची दिवाळी अंधारात जाऊ नये.”
त्यासाठी दिवाळीपूर्वी सर्व कामगारांना चालू आणि थकीत वेतन, मागील फरक रक्कम तसेच बोनस देण्याचे निर्देश संचालक पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वेतन न देणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याबाबतही चर्चा झाली.

या बैठकीस भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश महामंत्री किरण मिलगीर, श्रीमती शर्मीला पाटील,
तसेच महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ चे अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे,
कार्याध्यक्ष अमर लोहार आणि निखिल टेकवडे उपस्थित होते.

बैठकीदरम्यान संचालक मा. पवार यांनी सांगितले की,
कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर नोव्हेंबर महिन्यात सविस्तर बैठक पुन्हा आयोजित केली जाईल अशी हमी व्यवस्थापनाने दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button