इतर

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध कराव्या वाटतात मग शेतकऱ्यांची कामधेनु का नको ? पवार

पारनेरच्या बाजार समितीच्या निवडणुकीवर मनसे नेते अविनाश पवारांचा घणघणात

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी

पारनेरची ओळख महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून आहे. ही ओळख मिटविण्यासाठी व पाणीदार तालुका बनविण्यासाठी इथे फक्त जेष्ठ समाज सेवक सन्माननीय अण्णासाहेब हजारे यांनी निपक्ष पणे लढा दिला हे कधीच विसरून चालणार नाही पण पुढे सत्ताधारी सत्ता उपभोगना-यांनी आजपर्यंत फक्त मोठ्या मोठ्या घोषना कोटी कोटीची आकडेवारी जाहीर करत शेतकरी बांधवांसह सर्व सामान्य जनतेची फसवणूक करुन, दिशाभूल करत, आश्वासनांचे गाजर दाखवायचं कामं लोकप्रतिनिधींकडुन चालु आहे .सत्ता येते सत्ता जाते पण इथं सगळ्याच राजकीय पुढा-यांचं आतुन साट- लोट असल्याचा गंभीर आरोप मनसे चे माथाडी कामगार जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार यांनी केला.

पारनेर तालुक्यातील शेतक-यांची कामधेनु बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी कोणीही इच्छुक नाही हे विशेष याचाच अर्थ असा आहे की पुढा-यांचं साट- लोट जगजाहीर आहे सर्व सामान्य कार्यकर्ता राजकारणात संपविण्याचा कुटील डाव खेळला जातो आहे हे दुर्दैवी आहे.तालुक्याच्या ग्रामपंचायत,सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध करना-या शेतक-यांची कामधेनु बाजार समिती बिनविरोध करावीशी वाटली नाही हे मोठं आश्चर्य आहे.या सर्व गोष्टी,घटनांवर पारनेर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुणाच्या ही दबावाला बळी न पडता शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी तसेच सर्व सामान्य जनतेला जिथं जिथं अडचण येईल तिथं तिथं खंबीरपणे पाठीशी उभी राहते.आक्रमकपणे आवाज उठवत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हे सर्वच राजकीय पक्ष डावलण्याचे कामं करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गृहीत धरले जाते पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या चाललेल्या झिंगाटाला आमचं एक छिंद्र बुडवायला भारी पडेल हे विसरू नये. यांचं राजकीय साट-लोट उघड केल्यामुळे पारनेर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बाजार समिती मध्ये डावलले जात आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाजार समिती मध्ये चाललेल्या राजकीय दुकान दारीसह सर्व गोष्टी वर महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना लक्ष ठेवणार आहे.तिथे चाललेलं माथाडी कामगारांच शोशन ,पारनेर तालुक्यातील भुमीपुञांना डावलून परप्रांतीय कामगारांची भरती,त्यातुन मिळत असलेला मलीदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना थांबवणार म्हणजे थांबवणारच .येणा-या विधानसभा निवडणुकीत यांना यांची जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच दाखवणार असल्याचे पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button