निघोज परिसरात विजेचा पुरवठा दिवसभर सुरळीत ठेवा-रुपेश ढवण

पारनेर/प्रतिनिधी :
निघोज आणि परिसरातील भागात अतिवृष्टीमुळे गवत व झाडे तसेच उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या भागात गर्द झाडी व बागायत पट्ट्यामुळे ऊस तसेच फळबागा यांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने हिंस्त्र जनावरांना लपण्यास जागा आहे. साधारण बिबट्यांची संख्या मोठी असल्याने या परिसरात भितीचे सावट आहे. यासाठी दिवसा विजेचे भारनियमन न करता दिवसभर शेतकऱ्यांसाठी विजेचा पुरवठा करणे आवश्यक आहे. अशी मागणी करणारे निवेदन निघोज येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश ढवण यांनी महावितरण कंपनीला दिले आहे.
दरम्यान सध्या कांद्याच्या लागवडीही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यासाठी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री कधीही शेतात जाणे गरजेचे असते. यासाठी विज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी दिवसभर विज पुरवठा खंडीत न करता सातत्याने दिवसभर विज देण्यात यावी आशी विनंती महावितरणला निवेदनामध्ये केली आहे.