शेवगाव बाजार समिती निवडणूक अंतिम टप्प्यात!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने प्रचार यंत्रणा गतिमान झाली आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर तर विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ पॅनल यांच्यात सरळ लढत होत आहे.
मतदारांच्या गाठी भेटी घेऊन मतदान प्रक्रिया समजून सांगण्यात कार्यकर्ते व्यस्त आहेत. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी अतिशय चाणक्य बुद्धीने कार्यकर्त्यांमध्ये निवड करून उमेदवारी दिली आहे. स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्याकडे पहिल्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते अशी सूत्रता मानली जायची मात्र आता जनतेत नवीनच चर्चा रंग धरत आहे. त्यामध्ये एकनिष्ठ, निकटवर्तीय व सामान्य कार्यकर्ता अशी तिहेरी सूत्रता पाहवयास मिळत आहे. यांसह कार्यकर्त्यांचा मोठा संच घुले पाटलांकडे आहे. त्यामध्ये एकनिष्ठ व सामान्य कार्यकर्ता हा नेहमीच घुले घराण्यावर श्रद्धा ठेवून प्रामाणिक काम करत आहे. तर घुले कुटुंबाजवळ स्वतःला निकटवर्तीय म्हणुन घेऊन काही मिळेल याच आशेवर पाण्यात देव ठेवून आहे. काही असो मात्र अशा निकटवर्तीयांना घुले बंधूंनी दूरच लोटले पाहिजे अशी सामान्य जनतेची भावना आहे. विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांनी सामान्य कुटुंबातील लोकांनाच उमेदवारी देऊन सत्ताधारी गटा पुढे आव्हान उभे केले आहे.
मात्र या निवडणुकीत नेहमीच शेवगाव तालुक्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या डॉ. खासदार सुजय विखे हे आव्हाणे येथील प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यामुळे उलट सुलट चेर्चेला उधाण आले.
स्व.लोकनेते मारूतराव घुले पाटलांपासून तिसऱ्या पिढीत समाजसेवेचा वारसा घेतलेल्या घुले घराण्याची जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी ओळख आहे. चंद्रशेखर घुले पाटलांनी दिलेल्या उमेदवारालाच विजयी करण्याची जबाबदारी समजून कार्यकर्त्यांनी काम करावे. पद व प्रतिष्ठा ही प्रामाणिक कार्यकर्त्याला नेहमीच मिळते हा इतिहास आहे. त्यासाठी नेहमीच सक्रिय समाज सेवेत सहभाग नोंदवला पहिजे. त्यासाठी गाव पातळी पासुन संघटन वाढवले पाहिजे.
राजेंद्र आढाव
सरपंच तथा युवा नेते भायगाव
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीही शेतकऱ्यांची कामधेनु आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर मंडळातील सर्वच उमेदवार विजयी होतील. जुन्यांसह नवीन तरुणांना काम करण्याची संधी या निमित्ताने मिळेल. मात्र पुढील काळात चंद्रशेखर घुले पाटील यांना राजकीय क्षेत्रात बळकटीसाठी सामान्य कार्यकर्त्यांच्या इच्छेला गती मिळाली पहिजे. जिल्ह्याच्या राजकारणात शेतकरी व सामान्य जनतेच्या हितासाठी महत्त्वाचे पद मिळण्यासाठी आता पूर्ण ताकतीने उभा राहण्याची गरज आहे.
शंकरराव नारळकर
माजी सरपंच भातकुडगाव