इतर

नांदूर पठार येथे स्व.अतुल अरुण राजदेव (गुरुजी) यांच्या स्मरणार्थ गाव चॅम्पियन प्रीमियर लीग मे २०२३ चे आयोजन

दत्ता ठुबे

पारनेर’-पारनेर तालक्यातील नांदूर पठार येथे स्व.अतुल अरुण राजदेव (गुरुजी) यांच्या स्मरणार्थ जन्मभूमी युवा प्रतिष्ठाण,नांदूर पठारच्या वतीने गाव चॅम्पियन प्रीमियर लीग मे २०२३ चे भव्य आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा ग्रामीण व शहरी खेळाडू यांचा भरणा असणारी,खेळाडूंना क्रीडक्षेत्रात वाव देण्याच्या उददेशाने स्पर्धा अनोखी ठरली.

अंतिम सामन्यात पप्पूदादा फायटर्स संघाने फिनिक्स फायटर्स संघाचा ४० धावांनी पराभव करत विजेतेपदावर आपले निर्विवाद वर्चस्व मिळविले तर फिनिक्स फायटर्स संघ उपविजेता ठरला.तसेच जन्मभूमी सुपर किंग, शिवगर्जना लायन संघही तितकेच तुल्यबळ होते.

या स्पर्धेसाठी नांदूर पठार गावच्या विद्यमान सरपंच सौ. श्रामिणीताई संदीप चौधरी यांनी प्रथम पारितोषिक रू.१११११,श्री.दिनेश नवनाथ घोलप (युवा उद्योजक) यांसकडून रू.७००१रू.असे द्वितीय पारितोषिक, स्व.स्नेहल जयराम चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री. स्वप्निल ज. चौधरी यांसकडून विजेता,उपविजेत्या संघास आकर्षक चषक,सहभागी संघमालक यांसाठी सन्मानचषक स्व. हौसाबाई दे.आग्रे यांच्या स्मरणार्थ श्री. अरुण दे.आग्रे यांनी, सामनावीर व मालिकावीरसाठी ज्येष्ठ नागरिक श्री.भाऊ मा. आहेर, प्रविण दा. चौधरी,क्रीडा साहित्य सौजन्य श्री. विजय बा. बोंटे, श्री.राहुल शं. घोलप, उदयोन्मुख खेळाडूकरिता स्मार्ट वॉच प्रविण चौधरी,तसेच उदयोन्मुख खेळाडू व ३५+ खेळाडू यांस शशी आग्रे,शिस्तबद्ध संघ म्हणून श्री.उमेश ब.घोलप यांसकडून चषक देण्यात आले. या स्पर्धेसाठी मंडप सौजन्य मा.श्री.सूर्यकांत वलवेसाहेब,श्री. नितीन अ.आहेर,श्री. दत्तात्रय देशमानेसाहेब,श्री.नामदेव बा. आग्रेसाहेब,श्री.अमित ज्ञा.देशमाने यांनी मदत केली. थंडगार पाणी जार व्यवस्था श्री.नीलेश चौधरी यांच्या वतीने करण्यात आली.

या स्पर्धेत एकूण सहा साखळी सामने खेळविण्यात आले आणि सरासरी धावगतीच्या आधारावर दोन संघ पात्र झाले. या स्पर्धेत सामनावीर म्हणून शिवदास घोलप,सागर राजदेव,दिनेश आग्रे, स्वप्निल राजदेव,सूरज चौधरी,किरण चौधरी,प्रविण चौधरी(अंतिम सामन्यात) तर सलग दोन वर्षे मालिकावीर म्हणून सागर राजदेव यांनी बहुमान मिळविला.

स्पर्धेच्या बक्षिस वितरणसमयी प्रमुख पाहुणे श्री.संदिपभाऊ चौधरी (स्वीय सहायक, मा.आमदार निलेश लंकेसाहेब,श्री.सन्नवर शेख,श्री. प्रवीण थोर, ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनिल राजदेव(संचालक,मा. अध्यक्ष जन्मभूमी युवा प्रतिष्ठान),श्री.नारायण आग्रे,(ग्रा.स.) श्री.शशिकांत आग्रे,(ग्रा.स.) श्री अमित देशमाने (संचालक,नांदूर पठार सोसा.), रवींद्र राजदेव (माजी उपसरपंच),संघमालक रंगनाथ आहेर-माऊली आहेर, विनायक देशमाने-अनिल ठुबे, पोपट राजदेव,महेश आहेर-शुभम आहेर
या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

संपूर्ण स्पर्धेमध्ये पंच म्हणून खंडू जाधव आणि नवनाथ मधे सर त्याचप्रमाणे प्रसिद्ध समालोचक तथा निवेदक श्री.प्रविण पानसरे (गुरूजी), विनोद श्रावदे यांनी मोलाची भूमिका पार पाडली. जन्मभूमी युवा प्रतिष्ठाण अध्यक्ष श्री. शरद घोलप यांनी स्पर्धेच्या आयोजन कमिटी आणि सर्व सहभागी खेळाडू ,संघमालक यांचे मनापासून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button