इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१७/१०/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २५ शके १९४६
दिनांक :- १७/१०/२०२४,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०४,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पौर्णिमा समाप्ति १६:५६,
नक्षत्र :- रेवती समाप्ति १६:२०,
योग :- हर्षण समाप्ति २५:४२,
करण :- विष्टि समाप्ति ०६:४९, बालव २७:०५,
चंद्र राशि :- मीन,(१६:२०नं. मेष),
रविराशि – नक्षत्र :- कन्या(०७:४२नं. तुला) – चित्रा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०१:४२ ते ०३:०९ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:२५ ते ०७:५२ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:१४ ते ०१:४२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:४२ ते ०३:०९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:३७ ते ०६:०४ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
कार्तिकस्नानारंभ, कुलधर्म, ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे, नवान्नप्राशन, अन्वाधान, आग्रयण, रवि तुला ०७:४२, मु. ३० साम्यार्घ, पुण्यकाल सूर्योदय ते ११:४२, भद्रा ०६:४९ प., पौर्णिमा श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन २५ शके १९४६
दिनांक = १७/१०/२०२४
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
मानसिक चलबिचलता राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. सामाजिक भान राखून वागाल. कार्यक्षेत्रात वाढीव अधिकार प्राप्त होतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

वृषभ
जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरात आनंदी वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठांचा सल्ला व मत उपयोगी पडेल.

मिथुन
जवळच्या नातेवाईकांशी गप्पा होतील. कलेला चांगले प्रोत्साहन मिळेल. मान-सन्मान प्राप्त होतील. आनंदाची अनुभूति घ्याल. कामाच्या स्वरुपात काही क्षुल्लक बदल करावे लागतील.

कर्क
पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. अति तिखट पदार्थ टाळा. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. नवीन ओळखीतून चांगला लाभ होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

सिंह
आपली चांगली वर्तणूक लोकांना आकर्षित करेल. त्यातूनच समाधान लाभेल. जवळच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. टीमवर्क यशस्वी रित्या पार पाडाल. समस्यांचे निराकरण करता येईल.

कन्या
लोकांशी बोलताना आपले विचार पक्के ठेवा. आपले मुद्दे ठामपणे मांडा. कोणत्याही वादात अडकू नका. वातावरण अनुकूलतेसाठी प्रयत्न करावेत. महिला सहकार्‍याकडून मदत मिळेल.

तूळ
आपली एखादी चुकही मान्य करावी लागेल. निष्काळजीपणा कमी करा. ज्येष्ठ व्यक्तींच्या भेटीचे योग. कामातून काहीनाकाही लाभ मिळेल. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्या.

वृश्चिक
कामातील ताणाचे योग्य नियोजन करावे. अतिरिक्त भर घेऊ नका. एखाद्या गोष्टीत माघार घ्यावी लागू शकते. तज्ञांच्या मतावर विश्वास ठेवून काम करावे. आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडू शकाल.

धनू
कामाचा उरक वाढवा. मुलांकडून लाभ होतील. जुनी देणी फेडू शकाल. कामात आपले मत विचारात घेतले जाईल. आवश्यक गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

मकर
समोरील व्यक्ति आपला निर्णय मान्य करेल. हुशारीने वागावे. प्रवास लाभदायक ठरतील. जुन्या मित्रांशी संवाद साधता येईल. कर्जाऊ व्यवहार टाळावेत.

कुंभ
जोडीदाराच्या मदतीने अडकलेली कामे पुढे न्याल. दिवस मजेत जाईल. अनावश्यक खर्च टाळावेत. बोलताना शब्द जपून वापरावेत. गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल.

मीन
लोकांवर अति अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्यावे. संपत्तीत वृद्धी होऊ शकेल. काही कारणास्तव प्रवास करावा लागेल. कोणत्याही गोष्टीत अति घाई करू नका.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button