वासुंदे वाबळेवस्तीे येेथे हनुमान मंदिर मूर्तीप्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील वासुंदे येथील वाबळेवस्ती,उगलेवस्ती येथे नवीन हनुमान मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व भव्य कलशारोहन सोहळा येत्या मंगळवारी दि. २३, २४, २५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अमृतमय सोहळ्याचा प्रारंभ येत्या मंगळवारी (दि. २३ मे) होणार आहे. या दिवशी दुपारी ३ ते ५ वाजता हनुमान मूर्ती भव्य मिरवणूक व मूर्तीचा धान्यधिवास, सायं. ७ ते ९ कैलास महाराज येवले (आळंदी देवाची) यांचे हरिकीर्तन होणार आहे तसेच बुधवार (दि. २४ मे) सकाळी ७ वाजता मूर्तीस्थापना सोहळा तसेच दुपारी १.४५ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा यांच्या शुभहस्ते ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी देवाची), अखिल भारतीय चतुर संप्रदाय अध्यक्ष श्री श्री १००८ महंत डॉक्टरकृष्ण दास सावरिया बाबा यवतमाळ, ह. भ. प. डॉ. कृष्णकृपांकित विकासानंद महाराज मिसाळ (संत पंढरी, निमगाव वाघा) ह. भ. प. चत्तर महाराज शास्त्री (कानूर पठार), महंत श्री. कल्याणदासजी (कालापीपल) श्री. महंत कलानीदास (झासी) राधिका दास महाराज (प्रयागराज), अण्णा काका पोळ (पळशी), ह. भ. प. भागवताचार्य रमेश महाराज कुलकर्णी, ह. भ. प. प्रेमानंद आंबेकर शास्त्री आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम पौराहित म्हणून श्री गणेश शास्त्री कुलकर्णी (राजुरी) वेदमूर्ती गिरीराज मोहोळकर (पुणे), वेदमूर्ती ऋषिकेश (पुणे), वेदमूर्ती चैतन्य धर्माधिकारी (लातूर), किरण महाराज कुलकर्णी हे आहेत. दि. २४ रोजी सायंकाळी ७ ते ९ श्री. महामंडलेश्वर महंत काशिनाथदास पाटील महाराज (निरमोही आखाडा-क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक) यांचे हरिकीर्तन होणार आहे. गुरुवारी (दि. २५ मे) सकाळी ९ ते ११ ह. भ. प. अमृताश्रम स्वामी महाराज (बीड) यांचे हरिकीर्तन होईल. या कार्यक्रमानिमित्त तिनही दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले आहे पारनेर तालुक्यातील तसेच वासुंदे परिसरातील हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती जोगेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन जालिंदरमहाराज वाबळे यांनी दिली आहे.
