इतर
पारनेर तालुक्यातील तिखोल येथील बाळासाहेब ठाणगे जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित

दत्ता ठुबे
पारनेर:- पारनेर तालुक्यातील तिखोल गावचे प्रगतशिल शेतकरी म्हणून परीसरात ख्याती असलेले बाळासाहेब ठाणगे यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) अहमदनगर अंतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार सन 2023 चा ढोकेश्र्वर सेंद्रिय शेती गटातील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भाऊ ठाणगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आज दि.३ रोजी अहमदनगर येथे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री.अशिष येरेकर व प्रकल्प संचालक (आत्मा )अहमदनगर मा.श्री. विलास नलगे यांचे हस्ते सपत्नीक प्रशस्तिपत्रक देवून सत्कार करण्यात आला.या बद्दल श्री. ठाणगे यांचे पारनेर तालुक्यातून स्वागत होत आहे.