माझ्यामुळे AC मध्ये बसणाऱ्या लोकांना घरा बाहेर पडावे लागले ! -आमदार निलेश लंके

सुलभा गायकवाड (असिस्टंट इंजिनिअरिंग )जलसंपदा विभाग OBC मुलींमधील महाराष्ट्रात प्रथम !
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी –
श्रीगोंदा कणसेवाडी गावांमध्ये तरुणांनी आपले सहकारी मित्र सरकारी कार्यालयात विविध पदावर नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा नागरी सत्कार कार्यक्रम तसेच श्रीगोंदा मार्केट कमिटी नवनियुक्त सभापती अतुल लोखंडे व उपसभापती मनीषाताई मगर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा साठी पारनेर नगरचे आ.निलेश लंके उपस्थित होते. त्याचा हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्या आला.
या गावांतील 20 मुले मुली यांची महाराष्ट्र पोलीस दलात नियुक्त झाली. या मध्ये
रविंद्र शेलार,पोपट म्हस्के , मच्छिंद्र पांडुळे, अभिजित जंजीरे, स्वप्निल आनंदकर,वैभव गिरमकर,अक्षय खामकर, शिवाजी दरोडे, मिलिंद रगसिंग,तुषार वाघ, महेश लोखंडे, महेश शेलार, दिपक दळवी, बाळासाहेब दगड,शुभांगी जाधव, तेजश्री शेळके, जागृती मचिंदर, मोनाली औटी,मोहिनी पिसाळ. त्याच प्रमाणे
NMMS शिष्यवृत्ती मध्ये विशाल संतोष ढगे,ओंकार दिलीप ढगे,निकिता रामनाथ धुमाळ, माधुरी विजु जाधव. हे विद्यार्थी पास झाले आहेत.
या वेळीं प्रमुख उपस्थिती केशवभाऊ मगर
मा. व्हा.चेरमन नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा,पारनेर चे नगरपालिका अध्यक्ष विजय भाऊ औटी, सचिन पठारे भास्करराव वागस्कर ,संदिप रोडे
बाबासाहेब जगताप निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुभान तांबोळी हे होतें या वेळीं केशव भाऊ मगर व निलेश लंके यांचे भाषण झाले. या वेळीं बोलतांना निलेश लंके म्हणाले की या मुलांच्या यशा मागचे कष्ट त्याग पहिला पाहिजे इतरांनी याच्या कडून प्रेरणा घेतली पाहिजे.
सुलभा गायकवाड सारखी खेड्या गावांतील मुलगी ही जलसंपदा विभाग OBC मुलींमधील महाराष्ट्रात प्रथम आली . मला तिचा अभिमान वाटतो तिचा आदर्श इतर मुलींनी घेतला पाहिजे. या वेळी त्यांनी नवं नियुक्त उमेदवाराचे कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या वेळीं कणसेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
सचिन मैंद , घनश्याम ढगे, गणेश भोईटे, दत्तात्रय खराडे, अनिकेत मैंद,बापुराव गुंजाळ, संतोष जाधव,बबलू कंगणे. यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गावातली विजेची अडचण पाहत जो पर्यंत हे बीजेपी सरकार आहे तो पर्यंत लाईट अशीच आपल्या बरोबर खो-खो खेळणार आहे,त्या मुळे नागरिकांनी विचार
केला पाहिजे.आता पुढील इलेक्शन लागले की भूछत्रा सारखे नेते मंडळी उगवतील त्याच्या भुल थामाना बळी पडू नका. माझ्या मुळे AC मध्ये बसणारे काहीं लोक घराच्या बाहेर पडले आहेत त्याचे श्रेय त्यांना नका देऊ मला द्या कारण ते माझ्या मुळे बाहेर पडले आहेत. असे नाव न घेता अप्रत्यक्ष टोला आ.लंके यांनी खा.सुजय विखे यांना सदर समारंभात लगावला.