शेवगाव-पाथर्डी रस्त्यावर खड्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात बांधकाम विभागाला दिले निवेदन

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शहरातील संत गाडगे महाराज चौकाजवळील विद्यानगरी कॅम्पस समोरील शेवगाव-पाथर्डी रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून सदरच्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशा आशयाचे निवेदन अॅड.डॉ.शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.डांगे एस.जे. यांना आज शेवगाव येथे देण्यात आले.आज दि.०८ रोजी शेवगाव शहरातील विद्यानगरी कॅम्पस समोरील शेवगाव-पाथर्डी रस्त्यावर कायम पाणी साचून मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यातच नाही ते उन्हाळ्यातही या रस्त्यावर नित्याचे पाणी साचलेले असते. यामुळे वाहन चालकांना, सर्वसामान्य लोकांना, शाळकरी मुलांना या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरथ करावी लागते. रस्त्याचा अंदाज येत नसल्याने आत्तापर्यंत दुर्दैवाने अनेक अपघातही झाले आहेत. यापूर्वी या ठिकाणी छोटा पूल तयार करून साइड गटार करण्याचे आश्वासनही सा.बा.विभागाकडून देण्यात आले होते. परंतु आजपर्यंतही त्यावर काही कार्यवाही झाली नाही. तरी पावसाळा सुरु होण्यापूर्वी सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा संघटनेच्या वतीने याबाबत तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी जनशक्तीचे उद्योग आघाडीचे अध्यक्ष अशोकराव ढाकणे, राजेंद्र पोटफोडे, सुरेश चौधरी, अकबर शेख, शंकरराव देवढे, गणेश बोरुडे, जहीरउद्दीन दातरंगे, मुकुंद पोटफोडे, भिमराज ढगे, आकाश गोरे, प्रकाश काळे आदि यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.