भाजपा शिर्डी लोकसभा निवडणुक प्रमुखपदी राजेंद्र गोंदकर यांची निवड .

शिर्डी /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी शिर्डी लोकसभा निवडणुक प्रमुख पदी भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची निवड झाली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी जाहीर केली आहे. शिर्डी लोकसभा निवडणुक प्रमुख म्हणून राजेंद्र गोंदकर तर विधानसभा निहाय निवडणूक प्रमुख म्हणून पूढील प्रमाणे अकोले – वैभवराव पिचड, संगमनेर – सतीश कानवडे, राहता – रघुनाथ बोठे, कोपरगाव – सौ. स्नेहलता कोल्हे, श्रीरामपूर – नितीन दिनकर, नेवासा – बाळासाहेब मुरकुटे
श्री. राजेंद्र गोंदकर हे तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या कार्यकाळात भाजपाचे काम वाढविले आहे. नवे जुने कार्यकर्त्याचा मेळ घालून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले आहे. बूथ सशक्तीकरण अभियान मध्ये अतिशय चांगले काम केले आहे. सरलं अँप नोंदणी मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. धन्यवाद मोदीजी पत्र मोहीम मध्ये ही उल्लेखनीय काम केले असून, वरच्युअल बैठकीत सुद्धा एक नंबर कार्य केले आहे. ठाकरे सरकारच्या काळात अनेक आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुशीत तयार झालेले गोंदकर यांनी कोरोना काळात किराणा किट वाटप, भोजन वाटप केले आहे.
श्री. गोंदकर यांच्या निवडीने शिर्डी लोकसभा मतदार संघ भाजपा नक्की जिंकेल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करित आहे.