अहमदनगर

मुळा नदी वाहु लागली, पाणलोटात संततधार, आंबित धरण भरले!


———

कोतुळ प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील मुळापाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे संतधर पावसाने मुळे मुळा नदी वाहती झाली असून या नदीवरील आंबित धरण ओसंडून वाहू लागले आहे

मुळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने मुळा नदी उगम जवळ आंबित गावात असणारे मुळा नदीवरील आंबित धरण आज ओव्हरफ्लो झाले अहमदनगर जिल्ह्यातील यावर्षीच्या पहिल्या पावसाळ्यात भरणारे आंबित धरण हे जिल्ह्यातील पहिले धरण ठरले आहे मान्सूनच्या दमदार एन्ट्रीने अकोले तालुक्यातील हे धरण भरले आहे

मुळा नदी पाणलोट मध्ये गेल्या दोन दिवसापासून मान्सून ची दमदार एन्ट्री सुरू असल्याने घाटमाथ्यावर तसेच सम्पूर्ण अकोले तालुक्यात पाऊस सुरू आहे यामुळे मुळा नदी पाणलोट क्षेत्रात मुळा नदी वाहू लागली आहे उगमाजवळ असणाऱ्या आंबित या लघु प्रकल्पाची साठवण क्षमता 193 दशलक्ष घन फूट आहे आज या धरण्यात पाण्याची जोरदार आवक झाल्याने बुधवारी दुपारी दोन वाजता धरण ओसंडून वाहू लागले आहे यामुळे मुळा नदी वाहती झाली असून मुळा नदीचा प्रवाह पुढे झेपावला असून लवकरच हा प्रवाह पिंपळगाव खांड धरणात स्थिरावणार आहे मुळा पानलोट क्षेत्रात व भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे मुळा नदी पाणलोट क्षेत्र असणाऱ्या राहुरीतील मुळा धरणाकडे पाण्याची आवक लवकरच सुरू होण्याची आता आशा निर्माण झाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button