इतर

जखणगांव येथील महा आरोग्य शिबिरात ९५०रूग्णांची मोफत तपासणी व उपचार

शिबिरातील १६० रूग्णांवर शस्त्रक्रिया करणार

दत्ता ठुबे
नगर:-नगर तालुक्यातील आरोग्य ग्राम जखणगांव येथे आज ग्रामपंचायतच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यात एकुण ९५० रुग्णा़ंची मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज विळद घाट, आयुष विभाग शासकीय रूग्णालय नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी(खातगाव),अहमदनगर होमिओपॅथिक कॉलेज,योग विद्या धाम नाशिक व डाॅ.गंधे हॉस्पिटल जखणगाव यांच्या तज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात सर्व रूणांची तपासणी केली.
विखे पाटील मेडिकल कॉलेज मार्फत यातील १६० रुग्णांवर विळद घाट येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
आमचे जखणगांव हे आरोग्य विषयी सतत जागरूक असुन भविष्यात देशातील पहिले आरोग्य ग्राम म्हणून सन्मानास पात्र होईल यासाठी आपण सतत प्रयत्न करणार अशा भावना जखणगांव चे लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या शिबिरात जेष्ठ वैद्य डाॅ. श्रीधर दरेकर यांचे पुजन करुन गुरुपुजनाचा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती डाॅ. दिलीप पवार,जेष्ठ हृदयरोग तज्ञ डाॅ.महेश जरे ,हिंगणगावचे सरपंच आबासाहेब सोनवणे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमास चेअरमन बाळासाहेब कर्डिले, अल्ताफ शेख, फिरोज शेख,नवनाथ वाळके, तात्या कर्डिले, प्रवीण पानसंबळ, रमेश आंग्रे, डाॅ.सुयश गंधे,ज्योती ऊमाप, सहदेव वाबळे, उमेश पिसे,गोविंदराव केसकर यांचे सह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच डाॅ.सुनिल गंधे, आबा सोनवणे,डाॅ. दिलीप पवार, बाळासाहेब शहाणे, सुरेश कार्ले, डाॅ. श्रीधर दरेकर, डाॅ. महेश जरे, डाॅ. अपूर्वा फिरोदिया,डाॅ.नाझिया शेख, प्रा फिरोज शेख, शुभांगी काकडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या शिबिरात डाॅ. महेश जरे, डाॅ. सुयश गंधे, डाॅ.संयोगिता गंधे, डाॅ. मंदार भनगे,डाॅ. संजय धोंडे,डाॅ. धुमाळ, डाॅ.नाझिया शेख,डाॅ. अपूर्वा गांधी,डाॅ.किर्ती गंधे,डाॅ. मोहीनी जाधव,डाॅ. संजय जोशी, डाॅ. प्राजक्ता गंधे,डाॅ. रूषाली झावरे, डाॅ.ज्योती शिंदे, डाॅ. सानिका गंधे ,विखे फाऊंडेशन चे डायरेक्टर डाॅ. अभिजीत दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमधील सर्व तज्ञ डॉक्टरांची टीम व डाॅ. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर होमिओपॅथी मेडिकल कॉलेजची टीम यांनी रूग्णांची तपासणी केली व औषधोपचार केले.

या शिबिरात अॅलोपॅथि,आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, नॅचरोपॅथी व योग अशा सर्व पद्धतीने औषधोपचार करण्यात आले.
यापुढील तपासण्या व ऑपरेशन १५जुलै पर्यंत विखे हॉस्पिटल विळदघाट येथे मोफत करण्यात येतील.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी अशोक ढगे,भागचंद पातारे ,श्रीकांत आपटे ,रजनी गंधे, अवधुत गंधे, सुभाष सौदागर, नवनाथ वाळके, ओंकार सोनवणे, रूपाली पाडळे, आवेज पटेल, नाजमिन शेख,राजेंद्र कर्डिले यांनी विशेष प्रयत्न केले.
याच कार्यक्रमात गावातील कृषी सहाय्यक शुभांगी काकडे यांचा पदोन्नतीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button