इतर
अहमदनगर मध्ये विविध ठिकाणी गुरूपौर्णिमा उत्सव साजरा

नगर:-सावेडीतील वसंतटेकडी येथील संदेशनगर मधील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने द्वारकामाई साई मंदिराचा 10 वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा निम्मित आयोजिलेल्या साई उत्सवामध्ये गुलमोहररोड,पाईपलाइन व परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली

होती.यामध्ये विविध वाद्य पथकसह रथातून साईंची मिरवणूक काढण्यात आली यावेळी साईचा सजीव देखावा होता तर नगरसेवक सुनील त्र्यंबके ,निखिल वारे, बाळासाहेब पवार यांच्यासह हजारो भाविक सहभागी झाले होते तसेच मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने एमआयडीसीच्या मंगल दत्त क्षेत्रात गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी स्वामी विश्वेश्वर महाराज यांनी भिक्षा झोळी फिरवली.गेली ३७ वर्षापासून परंपरेने चालू आहे.
